Bangladesh Hindus : फक्त एकवेळच जेऊ, पण…बांग्लादेशी नेत्याची गुर्मी, भारताला ललकारल

| Updated on: Dec 06, 2024 | 10:32 AM

Bangladesh Hindus : दिवसेंदिवस बांग्लादेशात भारतविरोध वाढत चालला आहे. आता तिथल्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या रूहुल कबीर रिजवी या नेत्याने उघडपणे भारताला ललकारण्याचा प्रयत्न केला आहे. विरोध म्हणून त्याने त्याच्या पत्नीची भारतीय साडी जाळली.

Bangladesh Hindus : फक्त एकवेळच जेऊ, पण...बांग्लादेशी नेत्याची गुर्मी, भारताला ललकारल
BNP ruhul kabir rizvi
Follow us on

बांग्लादेशात अल्पसंख्यक हिंदुंवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच एक मोठी बातमी समोर आलीय. बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) संयुक्त सरचिटणीस रूहुल कबीर रिजवी यांनी ढाका येथे आपल्या पत्नीची भारतीय साडी जाळली व भारताविरोधात प्रदर्शन केलं. रिजवी यांनी आंदोलनादरम्यान आपल्या कार्यकर्त्यांसह सर्वांनाच भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा आवाहन केलं. त्रिपुराच्या राजधानीत बांग्लादेशच्या सहायक उच्चायोगातील कथित तोडफोड आणि बांग्लादेशी झेंड्याच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी रिजवीने भारताविरोधात हे प्रदर्शन केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विरोध प्रदर्शना दरम्यान रिजवीने आपल्या पत्नीची भारतीय साडी जाळली. भारतातून येणाऱ्या वस्तू विकत घेऊ नका, असं त्याने उपस्थितांना आवाहन केलं. “ज्या लोकांनी आपला राष्ट्र ध्वज फाडला, त्यांचं कुठलही सामान आम्ही घेणार नाही” असं रिजवी म्हणाला.

“आमच्या माता-भगिनी आता भारतीय साडी परिधान करणार नाहीत. भारतीय साबण, टुथपेस्टही वापरणार नाहीत” असं रिजवी म्हणाला. “मिर्ची आणि पपईच उत्पादन आम्ही स्वत: करु. आम्हाला त्यांच्या सामानाची आवश्यकता नाही” असं रिजवी म्हणाला. “भारताने बांग्लादेशच्या संप्रभुतेला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला” असा त्याने विरोध प्रदर्शनादरम्यान आरोप केला.

रिजवी काय म्हणाला?

“बांग्लादेश आत्मनिर्भर आहे. आपल्याला ज्याची गरज आहे, त्या सगळ्याच बांग्लादेश उत्पादन करु शकतो. भारतीय प्रोडक्ट्सच समर्थन करण्याऐवजी आपल्याला स्वत:च्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक केली पाहिजे” असं रिजवी म्हणाला. विरोध प्रदर्शनादरम्यान रिजवीने भारतीय नेते आणि मीडियावर निशाणा साधला. चुकीच्या बातम्या पसरवल्याचा आरोप केला. या गोष्टींमुळे दोन्ही देशांचे संबंध बिघडत चालले आहेत असं तो म्हणाला. “बांग्लादेश दुसऱ्या देशाच्या संप्रभुतेचा सम्मान करतो, दुसऱ्या देशांकडून आम्हाला अशाच व्यवहाराची अपेक्षा आहे” असं रिजवी म्हणाला.

‘दिवसात एकदाच जेऊ पण…’

“आम्ही कधी भारतीय झेंड्याचा अपमान करणार नाही. पण आपल्या देशाविरुद्ध चुकीची कृती सहन करणार नाही. भारतीय प्रोडक्ट्सवर बहिष्कार हे शांततामय मार्गाने ताकतवर उत्तर आहे. बांग्लादेशने याआधी सुद्धा छळ करणाऱ्यांना पराजित केलय. बांग्लादेश कुठल्याही ताकतीसमोर झुकणार नाही, भले मग आम्ही दिवसात एकदाच जेऊ. पण त्यानंतरही आम्ही गर्वाने उभे राहू, आत्मनिर्भर राहू” असं रिजवी म्हणाला.