न्यूयार्क : गेल्या आठवड्यात २४ फेब्रुवारीला एक हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला. कोकेन बेअर असे चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटात एक जंगली अस्वल कोकेनचे सेवन करून मानवभक्षक बनतो आणि त्यानंतर संपूर्ण कथा त्याच्याभोवती फिरते. पण ही बातमी तशीच असली तरी सत्यकथा आहे. एका जंगली अस्वलाने १६५ कोटीचे कोकेन फस्त केले. आता प्रश्न आहे त्याला ते मिळाले कसे? घटना अमेरिकेतील जॉर्जियामधील आहे. या ठिकाणी अस्वल कोकेनच्या अतिसेवनाने मृत्यू झाला.मग जॉर्जिया ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच स्थानिक पोलीस कामाला लागले.
if i could snort these reviews i would pic.twitter.com/Uu9gomwfsO
हे सुद्धा वाचा— Cocaine Bear (@cocainebear) February 28, 2023
काय झाले असणार
पोलिसांनी तपास केला असता, प्रत्यक्षात अंमली पदार्थ तस्करांची खेप जंगलातून विमानाने जात होती. त्यावेळी विमानातून अचानक कोकेनची अनेक पाकिटे जंगलात पडली. योगायोगाने ती पॅकेट अस्वलाला सापडली. मग अस्वलाचा स्वभाव त्याला नडला. अस्वलाला कोणतीही नवीन गोष्ट आढळते तेव्हा ते कुतूहलाने ती गिळतात किंवा त्याच्याशी खेळातात. अशाच परिस्थितीत कोकेनच्या अतिसेवनामुळे अस्वलाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकेन खाल्यामुळे मरण पावलेल्या अस्वलाचे नाव पाब्लो एस्को बेअरवर ठेवण्यात आले होते.
अस्वलाला का दिले पाब्लो नाव
कोकेन खाल्ल्यानंतर मरण पावलेल्या अस्वलाचे नाव पाब्लो एस्को बेअर असे ठेवण्यात आले. त्याला कारणही तसेच आहे. पाब्लो हे नाव त्या अस्वलाला का दिला? हा प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या. पाब्लो हा जगातील सर्वात मोठा ड्रग लॉर्ड मानला जात होता, ज्याची दहशत त्यावेळी जगभर गाजली होती, म्हणून कोकेनच्या अतिसेवनाने मरण पावलेल्या अस्वलाला पाब्लो असे नाव देण्यात आले.
४० किलो कोकेन गिळले
पाब्लोने सुमारे 40 किलो कोकेन गिळल्याचे तपासात निष्पन्न झाले. ज्याची किंमत त्यावेळी 165 कोटी रुपये एवढी होती. मात्र, किती कोकेन जंगलात पडले होते आणि किती पाकिटे जंगलात विखुरली होती. हे पोलिसांना त्यावेळी कळू शकले नाही. या प्रकरणात अजून एक शक्यता आहे. अंमली पदार्थांचे तस्कर जंगलातून जात असताना अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला आणि सर्व सामान सोडून ते पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.