मोठी बातमी समोर येत आहे. इस्रायलच्या तेल अवीव शहराजवळ एका बस स्टॉपवर असलेल्या गर्दीमध्ये ट्रक घुसून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत 35 जण जखमी झाले. यामधील सहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात नसून दहशतवादी हल्ला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, इस्रायलच्या तेल अवीव शहराजवळ एक बस स्टॉप आहे. या बस स्टॉपवर गर्दीच्या वेळी ही घटना घडली आहे. चालकानं गर्दीमध्ये ट्रक घातला. या घटनेत 35 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून या ट्रक चालकावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. हिब्रो मीडियाने दिलेल्या माहितीनुसार जखमी व्यक्तींमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे, ही घटना घडण्यापूर्वी हे लोक तिथे असलेल्या एका प्रसिद्ध म्युझियमला भेट देण्यासाठी एका बसमधून उतरले होते. त्याचवेळी ही घटना घडली.
There was a major terrorist truck ramming attack moments ago in Glilot, outside the IDF intelligence base.
A terrorist from Qalansawe rammed his truck full speed into a bus at a bus stop as well as pedestrians.
About 40 are injured, some critical. The terrorist was shot. pic.twitter.com/xqKo2EOE06
— Documenting Israel (@DocumentIsrael) October 27, 2024
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एक ट्रक अचानक गर्दीमध्ये घुसला. या घटनेत अनेक नागरिक चिरडले गेले. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर वीस जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा एक दहशतवादी हल्ला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.