लाहौरः गुरुवारी पाकिस्तानमधील लाहौर (Lahore Blast) शहरात एकामागून एक अशा पाच बॉम्बस्फोट झाले. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच 20 जण गंभीर खमी झाले आहेत. लाहौर शहरातील लाहौरी गेटजवळ हे स्फोट झाले. स्फोटांची (Pakistan Blast) तीव्रता एवढी भीषण होती की, परिसरातील दुकाने आणि इमारतींच्या खिडक्याही फुटल्या. रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटरसायकलींचेही नुकसान झाले. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून बचतकार्यही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या हल्ल्यानंतर परिसरातील अनारकली बाजार बंद करण्यात आला आहे. या बाजारातही बॉम्ब ठेवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Blast near Lohari gate, Anarkali Bazar in Lahore, Pakistan.
Reports say 4 people have been killed and at least 22 injured.#LahoreBlast pic.twitter.com/2H94RLE2nZ— Saddam Khan (@Saddam_Khan_PTI) January 20, 2022
लहौर ऑपरेशनचे उप महानिरीक्षक डॉ. मुहम्मद आबिद खान यांनी जियो न्यूजला सांगितले की, सध्या हा तपास सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मात्र लवकरच या स्फोटांमागे कोण आहे आणि त्याचे कारण स्पष्ट होईल. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या स्फोटांमुळे जमिनीत तब्बल दीड फूट खोल खड्डा झाला. या स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांना लाहौरमधील मायो रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे बॉम्ब घटनास्थळावर पूर्वीपासूनच प्लांट करण्यात आले होते. लाहौरी गेटजवळ दररोज मोठ्या संख्येने लोक खरेदीसाठी येत असतात.
दरम्यान, घटनास्ळास्थळावर पोलीस आणि प्रशासनाने घेराव घातला असून आणखी पुरावे गोळा केले जात आहेत. स्फोटांसाठी वापरण्यात आलेले बॉम्ब IED होते की टाइम बॉम्ब होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये घटनास्थळावरील बचाव कार्याची दृश्य पाहता येतील. या स्फोटामुळे घटनास्थळावरील मोटरसायकललाही आग लागली. काही वेळातच ही आग विझवण्यात आली.
दरम्यान मायो रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
इतर बातम्या-