कुठल्याही युद्धात पाणबुडीची भूमिका खूप महत्त्वाची असते. कारण पाणबुडीमध्ये पाण्याखालून हल्ला करण्याची क्षमता असते. युद्धाचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत पाणबुड्यांनी अनेक महाकाय युद्धनौकांना जलसमाधी दिली आहे. त्यामुळे पाणबुडी कुठल्याही नौदलासाठी महत्त्वाची असते. आज पाणबुडी तंत्रज्ञानात मोठा बदल झाला आहे. अनेक अत्याधुनिक पाणबुड्या अशा आहेत, ज्या समुद्रात काही हजार फूट खोल जाऊ शकतात. ही पाणबुडी हाताळण्याासठी एक पथक असतं. प्रत्येक पाणबुडीचा एक कॅप्टन असतो. पाणबुडीच रक्षण करण्याची, शिस्त राखण्याची जबाबदारी त्या कॅप्टनची असते. पण कॅप्टनलाच त्याच्या जबाबदारीचा विसर पडला तर?. असाच एक धक्कादायक प्रकार ब्रिटनच्या रॉयल नेवीमध्ये घडला आहे.
ब्रिटनच्या नौदलात सगळेच जण यामुळे हैराण झालेत. ब्रिटनमध्ये एका कॅप्टनने पाणबुडीच्या आत महिला नौसैनिकासोबत अश्लील व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या कॅप्टनवर कारवाई करण्यात आलीय. ब्रिटनच्या रॉयल नेवीने वॅनगार्ड पाणबुडीच्या कॅप्टनला नोकरीवरुन काढून टाकलं आहे. महत्त्वाच म्हणजे अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम असलेली ही पाणबुडी होती. कॅप्टनने फक्त प्रायवेट मोमेंट्चसा व्हिडिओच बनवला नाही, तर आपल्या ज्यूनियर सोबत तो व्हिडिओ शेअर केला. ज्यावेळी हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला, त्यावेळी 4 बिलियन पाऊंडची ही पाणबुडी समुद्रात तैनात होती. या व्हिडिओमुळे ब्रिटेन रॉयल नेवीची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे.
त्या कॅप्टनला पुरस्कार मिळालेला
अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी लगेच तपास सुरु केला. ‘द सन’च्या वृत्तानुसार, पाणबुडीच्या कॅप्टनचे त्याच टीममधील महिलेसोबत अनैतिक संबंध होते. पाणबुडीमध्ये ज्या अधिकाऱ्याने हे कृत्य केलं, त्याला राजकुमारी ऐनीकडून OBE साठी सन्मानित करण्यात आलं होतं. हा व्हिडिओ समोर येताच कॅप्टनला तात्काळ नोकरीतून काढून टाकण्यात आलं, असं ‘द सन’ने म्हटलं आहे.
रॉयल नेवीमध्ये असं पहिल्यांदा घडलेलं नाही
“नियमांमध्ये न बसणारं कुठलही वर्तन आम्ही गांभीर्याने घेतो. असे प्रकार रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचलतो. जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल, मग त्याचा रँक काहीही असो” असं रॉयल नेवीने ‘द सन’ बरोबर बोलताना म्हटलं आहे. रॉयल नेवीमध्ये घडलेली ही अशी पहिली घटना नाहीय. 2017 मध्ये व्हाइस कॅप्टन आणि त्याचा डेप्युटी HMS विजिलेंटवर दोन ज्यूनियर महिला अधिकाऱ्यांसोबत संबंध ठेवल्याचा आरोप होता.