जेद्दाह : ब्रिटनच्या एका मुत्सद्दीने (British Consule General) सऊदी अरेबियात (Saudi Arabia) इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. याचा खुलासा करत त्यांनी मदिना येथील आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जेद्दाहमधील ब्रिटीश कन्सुल जनरलने आता त्याचे नाव बदलून सैफ-अशर असे केले आहे. इस्लाम धर्म स्वीकारणारे अशर हे दुसरे ब्रिटिश कौन्सुल जनरल आहेत.
सोशल मीडियावर सैफ-अशरचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सैफ-अशर मदिनाच्या अल नवाबी मशिदीत उभे आहेत. अशर यांनी म्हटले आहे की, ‘मदीना या माझ्या आवडत्या शहरामध्ये परतताना आणि पैगंबरांच्या मशिदीमध्ये फजरची नमाज अदा करताना मला खूप आनंद होत आहे.’ त्यांनी पुढे लिहिले की, ब्रिटीश मुस्लिम मदिना येथे परततील अशी मला मनापासून आशा आहे. सैफ-अशर म्हणाले की, कोरोना महामारीपूर्वी येथे दरवर्षी एक लाखाहून अधिक प्रवासी यायचे. सऊदी अरेबियात सुरू असलेला उत्कृष्ट विकास आणि सुविधा लक्षात घेता ही संख्या आणखी वाढेल याची मला खात्री आहे.
أنا سعيد جدًا بالعودة إلى مدينتي المفضلة – المدينة المنورة – وصلاة الفجر في المسجد النبوي ??? pic.twitter.com/DFdxJUrAaS
— Seif Usher سيف اشر (@seifusher) November 10, 2021
याआधी, ब्रिटिश कौन्सुल जनरल कॉलिस यांनीही सऊदी अरेबियात इस्लाम धर्म स्वीकारला आहे. 2016 मध्ये ते हजला पण गेले होते. इस्लाम धर्म स्वीकारण्यापूर्वी कॉलिसने सांगितले की, 30 वर्षे मुस्लिम समुदायांमध्ये राहिल्यानंतर आणि हुदाशी लग्न करण्यापूर्वी मी इस्लाम स्वीकारला.
इतर बातम्या-