Prince William Affair | ब्रिटनचं शाही कुटुंब अलीकडेच राजकुमारी केट मिडलटनचा एक फोटो शेअर केल्यामुळे चर्चेत होतं. फोटोमध्ये केट आपल्या तिन्ही मुलांसोबत बसलेली दिसतेय. केट मिडलटनवर पोटाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर बरेच दिवस केट कोणाला दिसली नव्हती. त्यानंतर तिचा फोटो समोर आल्याने बरीच चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, केड मिडलटनचा हा फोटो खरा नसून एडिटेड आहे. वाद इतका वाढला की, केटला माफी सुद्धा मागावी लागली. हा विषय शांत होत नाही, तोच शाही कुटुंब आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. केट मिडलटनचा नवरा प्रिंस विलियमच्या अफेअरची चर्चा सुरु आहे.
प्रिंस विलियमच प्रेम प्रकरण हे केट मिडलटनच्या इतके दिवस गायब असण्यामागच एक कारण असल्याच बोलल जातय. केटची जवळची मैत्रीण रोज हॅनबरीसोबत प्रिंस विलियमच अफेअर सुरु असल्याची चर्चा आहे. रोज हॅनबरी प्रिन्सची प्रेयसी आहे. महत्त्वाच म्हणजे प्रिन्सची प्रेयसी सुद्धा विवाहित आहे. लेडी सारा रोज हॅनबरी डेविड चोलमोंडेलीची पत्नी आहे. प्रिन्सच्या या प्रेम प्रकरणाकडे लोक किंग चार्ल्स आणि राणी कॅमिला पार्कर यांच्या दृष्टीकोनातून पाहत आहे. ब्रिटनमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती सुरु आहे. राजे किंग चार्ल्सच लग्न राजकुमारी डायनासोबत झालं होतं. त्यावेळी कॅमिला पार्करसोबत चार्ल्सच अफेअर सुरु होतं.
कशी सुरु झाली या अफेअरची चर्चा?
प्रिंस विलियम लेडी रोज हॅनबरीला डेट करत असल्याची अफवा पहिल्यांदा पसरलेली नाही. याची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. फक्त केट मिडलटनच्या फोटो वादामुळे हा विषय चर्चेत आला आहे. रोज आणि प्रिंस विलियम व्हॅलेंटाइन डे ला एकत्र होते. दोघांनी एकत्र सेलिब्रेशन केलं, अशी चर्चा आहे. प्रिन्सचा केटसोबतचा कारमधील एक फोटो समोर आला होता. लोकांच म्हणण आहे की, ती केट नव्हती तर रोज होती. कॉमेडियन स्टीफन कोलबर्टने ‘द लेट शो’ या आपल्या कार्यक्रमात प्रिन्स आणि रोजच्या प्रेमप्रकरणावरुन काही जोक केले, त्यानंतर या अफेअरची चर्चा सुरु झाली.