हिजबुल्लाहचे प्रमुख भाषण देत असतानाच इस्रायलकडून हल्ले, आवाजाने बेरूतमधील इमारती हादरल्या

| Updated on: Sep 19, 2024 | 9:04 PM

हिजबुल्लाहचे प्रमुख पेजर आणि वॉकी टॉकी स्फोटानंतर भाषण देत असतानाच इस्रायलने जोरदार हल्ले केले. इस्रायलचे युद्धविमान लेबनॉनवर गिरट्या घालू लागले. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने म्हटले आहे की ते सध्या दहशतवादी गटाच्या क्षमता आणि पायाभूत सुविधांचा ऱ्हास करण्यासाठी लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर हल्ला करत आहेत.

हिजबुल्लाहचे प्रमुख भाषण देत असतानाच इस्रायलकडून हल्ले, आवाजाने बेरूतमधील इमारती हादरल्या
Follow us on

लेबनॉनमधील पेजर आणि रेडिओ हल्ल्यानंतर हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह यांनी इस्रायलविरोधात संताप व्यक्त केला. नसराल्लाह म्हणाले की, इस्रायलने लेबनॉनमध्ये नरसंहार केला आहे. हे युद्धाचे आव्हान देण्यासारखे आहे. त्यामुळे इस्रायलने ज्या प्रकारे हल्ले करुन आपल्या नागरिकांना लक्ष्य केले. त्याने लाल सीमा ओलांडली आहे. हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाह पुढे म्हणाले की, इस्रायलने पेजरला लक्ष्य करून हल्ला केला. लेबनॉनमध्ये 4 हजारांहून अधिक पेजर्स वापरल्या जात असल्याची माहिती इस्रायलला होती. इस्त्राईलने एकाच वे 4 हजार लोकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. हल्ले फक्त हिजबुल्लाच्या सैनिकांवरच केले गेले नाहीत. तर हॉस्पिटल, मार्केट, घरे, खासगी वाहनांमध्येही ते घडले. याचा फटका हजारो महिला व बालकांना बसला आहे.

इस्रायलने गुरुवारी लेबनॉनमध्ये दहशतवादी गट हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य करत पूर्ण प्रमाणात हल्ला केला. हिजबुल्लाहने देशातील अलीकडील पेजर आणि वॉकी-टॉकी हल्ल्यांचा निषेध करणारे टेलिव्हिजन भाषण दिल्यानंतर लगेचच इस्रायल डिफेन्स फोर्सेसने हा हल्ला सुरू केला. आजचा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा हिजबुल्लाचा नेता सय्यद हसन नसराल्लाह हे इराण समर्थित लेबनीज गटाला भाषण देत होते. नसराल्लाह यांचे भाषण सुरू असताना, इस्रायली युद्धविमानांच्या आवाजाने बेरूतमधील इमारती हादरल्या, अशी बातमी रॉयटर्सने दिली.

हिजबुल्लाह प्रमुख पुढे म्हणाले की, यामुळे आम्ही गाझाला पाठिंबा देणे थांबवणार नाही. नसराल्लाह म्हणाले की, परिणामांचा विचार न करता लेबनॉन गाझाला पाठिंबा देत राहील. नसराल्लाह यांनी इस्रायलला इशारा दिला की, ते त्यांना हवे ते करू शकतात परंतु ते उत्तर इस्रायलमधील विस्थापित लोकांना त्यांच्या घरी परत पाठवू शकणार नाहीत.

आम्ही गुडघे टेकणार नाही

हिजबुल्लाच्या प्रमुखाने जाहीर केले की, अशा हल्ल्यांमुळे हिजबुल्लाह गुडघे टेकणार नाही. अमेरिका आणि इतर महासत्ता त्याच्या पाठीशी असल्यामुळे इस्रायलला तंत्रज्ञानाची धार आहे हे त्याच्या गटाला माहीत आहे. या आव्हानाचा सामना केल्यानंतर हिजबुल्लाह पुन्हा डोके वर काढेल, असा दावा नसराल्लाह यांनी केला. हिजबुल्लाला कितीही मोठा फटका बसला तरी तो वाकणार नाही.

इस्रायलला एकाच वेळी हजारो लोकांना मारायचे होते

इस्रायलने जे केले ते दहशतवादी कृत्य आणि नरसंहार असल्याचे नसराल्लाह म्हणाले. ही लेबनॉनच्या लोकांविरुद्ध आणि देशाच्या सार्वभौमत्वाविरुद्ध युद्धाची घोषणा आहे. इस्रायलला एकाच वेळी हजारो लोकांना मारायचे होते, असा दावा हिजबुल्लाच्या प्रमुखाने केला. सुदैवाने अनेक पेजर सेवाबाह्य होते आणि अनेकांना इतरत्र बंद ठेवण्यात आले होते.

हा हल्ला सुरक्षेला धक्का आहे

हिजबुल्लाच्या प्रमुखाने सांगितले की, सध्या आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही अनेक चौकशी समित्या स्थापन केल्या आहेत. आम्ही प्रथम हल्ले कसे झाले हे निश्चित करू. असे हल्ले पहिल्यांदाच झाले असून लेबनॉनच्या सुरक्षेला हा मोठा धक्का असल्याचे त्यांनी मान्य केले.