Canada Election Results Latest Update: कॅनडाच्या सत्तेत पुन्हा एकदा पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांचा विजय निश्चित दिसतो आहे. ट्रुडोच्या लिबरल पार्टीला (Liberal Party) या निवडणुकीत मताधिक्य मिळालं आहे. मात्र असं असलं तरी ट्रुडो यांची अतिशय मोठ्या विजयाची आशा मात्र पूर्ण होऊ शकली नाही. लिबरल पक्षानं दुसऱ्या कुठल्याही पक्षाच्या तुलनेत सर्वाधिक मतं मिळवली. याआधी 2015 च्या निवडणुकीत जस्टिन ट्रुडो यांना त्यांचे वडील आणि कॅनडाचे माजी पंतप्रधान पियरे ट्रुडो यांच्या लोकप्रियतेची मदत झाली आणि ते निवडणूक जिंकले होते. त्यानंतर पुन्हा एकता पक्षाचं नेतृत्त्व करत त्यांनी मागील 2 निवडणुका आपल्या दमावर जिंकून दाखवल्या. ( Canada Election 2021 Live Update: Prime Minister Justin Trudeau’s Liberal Party has the most seats, followed by the Conservatives at 103.)
कॅनडातील मतमोजणीची सध्याची परिस्थिती काय?
सध्याच्या मतगणनेनुसार, लिबरल पक्ष हा 148 जागांवर पुढं आेह तर कंजरव्हेटीव्ह पार्टी (Conservative Party) 103 जागांवर पुढं आहे. (Canada Live Election Results) ब्लॉक क्युबेकोईस 28 तर न्यू डेमोक्रॅटिक पार्टी 22 जागांरवर पुढं असल्याचं कळतं आहे. सध्यातरी असंच दिसतं आहे की, ट्रुडो यांना पुरेशा जागा मिळतील आणि कुठल्याही पक्षाच्या पाठिंब्याविना ते सरकार बनवतील. सध्या ते एवढ्या तरी जागा मिळवतील ती त्यांची खुर्ची शाबूत राहिल. विरोधकांकडून ट्रुडो यांच्यावर फायद्यासाठी वेळेआधी 2 वर्ष निवडणुका घेण्याचा आरोप होतो आहे. मात्र, हे सगळे आरोप ट्रुडो यांनी फेटाळून लावले आहेत.
ट्रुडो यांना कुणाचं थेट आव्हान?
पंतप्रधान जस्टिन ट्रु़डो यांना कंजरव्हेटीव्ह पक्षाचे नेते एरिन ओटुले यांनी कडवं आव्हान दिलं. निवडणुकीवेळी ट्रुडो यांनी दावा केला होता की, कोरोना संकटात लोकांना देशात कंजरव्हेटीव पक्षाचं सरकार नको आहे. कॅनडा सध्या जगातील त्या देशांच्या यादीत आहे, ज्या देशातील बहुतांश लोकांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे. ते म्हणाले की, जर विरोधी पक्ष सत्तेत आला तर कोरोनाविरोधातील कॅनडा कमकुवत होईल.
बहुमतासाठी ट्रुडोंना किती मतं हवी?
कॅनडाच्या निवडणुकीत (Elections in Canada) सत्ता स्थापनेसाठी कुठल्याही पार्टीला 38 टक्के मतांची गरज असते. त्यामुळे संसदेत त्या पक्षाचं बहुमत कायम राहतं आणि पाहिजे ते कायदे सरकार पारित करुन घेऊ शकते. 2019 च्या निवडणुकीत (Canada 2019 Elections) ट्रुडो यांच्या पक्षााल बहुमत मिळालं नव्हतं. ज्यामुळे कुठलाही कायदा संसदेत मंजूर करायचा असेल तर इतर पक्षांचं समर्थन घ्यावं लागत होतं. यंदा देशात 338 जागांसाठी मतदान झालं, त्यात कुठल्याही पक्षाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 170 जागांची गरज असते.