Bangladesh Violence : शेख हसीना यांना तीन विद्यार्थी नेत्यांमुळे सोडावा लागला देश? पाकिस्तान, चीन, अमेरिकेचे यासाठी नाव?

| Updated on: Aug 07, 2024 | 11:01 AM

sheikh hasina news update: बांगलादेशात आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन उभे करण्यासाठी पाकिस्तानने इस्लामिक छात्र शिबीरचा शस्त्र म्हणून वापर केला. जमात-ए-इस्लामी ही विद्यार्थी संघटना आहे. जमात-ए-इस्लामीचा संबंध आयएसआयशी आहे.

Bangladesh Violence : शेख हसीना यांना तीन विद्यार्थी नेत्यांमुळे सोडावा लागला देश? पाकिस्तान, चीन, अमेरिकेचे यासाठी नाव?
sheikh hasina
Follow us on

बांगलादेश सध्या गंभीर संकटातून जात आहे. बांगलादेशात निर्माण झालेल्या या संकटाचा केंद्रबिंदू विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांनी हिंसक प्रदर्शन करत बंगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडण्यास भाग पाडले. खरे तर विद्यार्थ्यांची आरक्षण रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली होती. त्यामुळे बांगलादेशमधील परिस्थितीला फक्त विद्यार्थी जबाबदार आहेत की शेख हसीना विरोधातील शक्ती आहेत. हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या हातातून जाऊन कट्टरपंथी शक्तींकडे गेल्याचे म्हटले जात आहे. जमात-ए-इस्लामी आणि विद्यार्थी संघटनांनी बांगलादेशात हिंसाचाराचा तांडव माजवला आहे. बांगलादेशातील आंदोलनामुळे चर्चेत आलेले ते तीन विद्यार्थी नेते कोण आहेत?

विद्यार्थी नेते कोण आहेत?

  1. नाहिद इस्लाम, ढाका विद्यापीठातील विद्यार्थी, नाहिद हा संपूर्ण आंदोलनाचा कोऑर्डिनेट आहे.
  2. आसिफ महमूद, ढाका विद्यापीठातील भाषा विषयाचा विद्यार्थी, देशव्यापी आंदोलनाचा हा प्रमुख भाग बनला.
  3. अबू बकर मजूमदार, ढाका विद्यापीठातील जिओग्राफी विभागातील विद्यार्थी, शेख हसीना यांना सत्तेपासून दूर करण्यात अबू बकर यांची प्रमुख भूमिका आहे.

बांगलादेशातील पोलिसांनी या तीन विद्यार्थ्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून जबरदस्तीने आंदोलन मागे घेण्याबाबतचा व्हिडिओ बनवून घेतला होता. ते कारागृहात असताना बांगलादेशाचे गृहमंत्री दावा करत होते की, त्यांनी स्वखुशीने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु जेव्हा सत्य समोर आले तेव्हा आंदोलन अधिक चिघळले. आज विद्यार्थ्यांचा हाच गट शेख हसीना यांनी देश सोडलाबद्दल आनंद व्यक्त करत आहे.

बांगलादेशातील परिस्थितीमागे चीन, पाकिस्तान, अमेरिका?

बांगलादेशातील परिस्थितीमागे तीन देशांचे नाव घेतले जात आहे. पाकिस्तान, चीन आणि अमेरिका यांचा हात असल्याचा आरोप शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद याने आजतकला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. बांगलादेशात आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन उभे करण्यासाठी पाकिस्तानने इस्लामिक छात्र शिबीरचा शस्त्र म्हणून वापर केला. जमात-ए-इस्लामी ही विद्यार्थी संघटना आहे. जमात-ए-इस्लामीचा संबंध आयएसआयशी आहे. या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आयएसआयने या संघटनेस मोठ्या प्रमाणात निधी दिला. सजीब वाजेद याने या प्रकरणात अमेरिकेचे नाव घेतले. मात्र, बांगलादेशात शेख हसीना यांचा पाडाव झाल्यानंतर अमेरिकेनेही वक्तव्य केले आहे. अमेरिकेने बांगलादेशात लोकशाही पद्धतीने सरकार स्थापन करण्याचा आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा

हे ही वाचा…

नोबेल विजेता मोहम्मद युनूसकडे बांगलादेशच्या अंतरिम सरकारची सूत्र, भारताविरोधात युनूस यांची व्हिलेनची भूमिका का?