बीजिंग : मंगळवारी चीनने आपली हाय-स्पीड मॅग्लेव्ह ट्रेन सुरू केली. या ट्रेनची कमाल वेगमर्यादा 600 किमी प्रतितास आहे. अधिकृत माध्यमांच्या म्हणण्यानुसार, जमिनीवर धावणारं हे सर्वात वेगवान वाहन आहे. चीनची अधिकृत वृत्तसंस्था सिन्हुआच्या मते, चीनच्या किनारपट्टीवरील किनिंगडॉ शहरात सार्वजनिकरित्या नवीन मॅग्लेव्ह परिवहन व्यवस्था सुरू करण्यात आलीय.
ऑक्टोबर 2016 मध्ये हाय-स्पीड मॅग्लेव्ह ट्रेन प्रकल्प सुरू झाला. एका अहवालात म्हटले आहे की, 2019 मध्ये 600 किलोमीटर प्रतितास वेगाच्या या गाडीचा एक नमुना तयार करण्यात आला होता. त्याची यशस्वी चाचणी जून 2020 मध्ये झाली.
या ट्रेनमध्ये 10 कोच बसविता येतील, असे प्रकल्पाचे मुख्य अभियंता डिंग सन्सन यांनी सांगितले. प्रत्येकाची क्षमता 100 प्रवाशांची असेल. ते म्हणाले की ही ट्रेन 1,500 किमीच्या परिघामध्ये प्रवास करण्यासाठी उत्तम उपाय आहे. पारंपरिक गाड्यांप्रमाणेच मॅग्लेव्ह रेल्वेची चाके रेल ट्रॅकच्या संपर्कात येत नाहीत.
दुसरीकडे आता चीनची बुलेट ट्रेन भारतीय सीमेजवळून धावणार आहे. असं म्हणतात की, यावर्षी अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीन तिबेटपर्यंत बुलेट ट्रेन चालवण्यास सुरुवात करेल. 2020 मध्येच 435 किमी लांबीच्या रेल्वे मार्गावर ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण झालेय. म्हणजेच चीनने तिबेटमधील ल्हासाला बुलेट ट्रेन चालवण्याची तयारी पूर्ण केलीय. ही ट्रेन चीनच्या जवळपास सर्व प्रांतांतून जाईल. चीनने 2025 पर्यंत हाय-स्पीड ट्रेनचे जाळे 50,000 किमीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
म्हणजेच एकीकडे चीन सीमेवरील वाद मिटविण्यासाठी भारताशी लष्करी आणि मुत्सद्दी चर्चा करीत आहे. कारण अद्याप लडाखमधील गोग्रा, हॉट स्प्रिंग, डेमचॉक आणि देप्सांग या दोन देशांमधील चर्चा सुरू आहे. दुसरीकडे त्याच्या षडयंत्रांची व्याप्तीही वाढत आहे. लांबलचक सीमा विवाद आणि तणाव असतानाही चीन सीमावर्ती भागात वेगाने पायाभूत सुविधा विकसित करीत आहे आणि आता चिनी बुलेट ट्रेन 160 किमी प्रतितास वेगाने तिबेटकडे धावणार आहे.
संबंधित बातम्या
चीनमध्ये आणखी एका धोकादायक विषाणूचा शिरकाव; पहिल्या मृत्यूनंतर खळबळ, जाणून घ्या विषाणूबद्दल
Nepal PM : शेर बहादुर देउबा नेपाळचे नवे पंतप्रधान, 165 मतांनी विश्वासमत जिंकलं, मोदींकडून शुभेच्छा
China launches world’s fastest maglev train at 600 kilometers per hour