चीनमध्ये (china) महाराष्ट्रातील पुणे, (pune) नागपूर, औरंगाबाद पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आलाय. त्यामुळे कोरोना (corona) संकटाचे ढग आणखी गडद होताना दिसतायेत. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असून चीन लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचं दिसतंय. भारताचा आणि चीनमधील कोरोना परिस्थितीचा विचार केल्यास पुण्यापेक्षा लहान शहरांमध्ये पुन्हा कडक कोरोनाचे निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आवश्यक ती खबरदारी देखील चीनमधील वेगवेगळ्या शहरांतील आरोग्य विभागाकडून घेतली जातेय. चीनच्या चांगचुन या 9 लाख लोकसंख्येच्या (population) शहरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चांगचुनमध्ये कुटुंबातील एका व्यक्तीला दर दोन दिवसांनी गरजेच्या गोष्टी घेण्यासाठी बाहेर जाण्याची परवानगी आहे. या ठिकाणच्या आरोग्य विभागानं सूचना दिली आहे की, सर्वांनी आपल्या आरोग्य चाचण्या करुन घ्याव्यात.
China imposes lockdown on 9 million residents in northeastern industrial center of Changchun amid new virus outbreak, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) March 11, 2022
चीनमधील कोरोनाच्या ताज्या आकडेवारीनुसार, चीनच्या पूर्वेकडील शेंडोंग प्रांतातील 5 लाख लोकसंख्या असलेल्या युचेंगमध्ये देखील लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. चीनमधील इतर शहरांची देखील अशीच परिस्थिती असून अनेक शहर महाराष्ट्रतील पुणे, नागपूर, औरंगाबाद या लोकसंख्येनं मोठ्या असलेल्या शहरांपेक्षाही छोटी आहेत. अशा चीनमधील छोट्या शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. चीनमध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून पुन्हा 397 प्रकरणं नोंदवली गेली आहे. त्यापैकी 98 प्रकरणं ही जिलिन प्रांतातील आहे. जिलिन हा प्रांत चीनमधील वाहन उद्योगांचे केंद्र असलेल्या चांगचुनच्या जवळ आहे. या प्रांतांमध्ये या आठवड्या अखेर 1 हजार 100 पेक्षा अधिक कोरोना प्रकरणं नोंदवली गेली आहे.
चीनध्ये एकूण नोंदवल्या गेलेल्या प्रकरणानुसार, चांगचुनमध्ये शुक्रवारी दोन कोरोनाची प्रकरणं नोंदवली गेली. चांगचुनमधील कोरोना रुग्णांची संख्या 78 वर पोहचली आहे. चीनमध्ये असलेले साथीचे आजार पाहता कोणत्याही शहरात कधीही लॉकडाऊन लावला जाऊ शकतो, असे संकेत तेथील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
चीनच्या चांगचुन या प्रांतापासून जवळ असलेल्या जिलिन शहरात 93 कोरोना प्रकरणांची नोदं करण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले असून प्रवास पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. जिलिनच्या कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात कोरोनाचं संक्रमण झालंय. यामुळे विद्यापीठाचं कॅम्पस पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. तर जिलिन शहरातील राज्य प्रसारक मंडळानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 74 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 6 हजार लोकांना विलगिकरणात ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
चीनमध्ये महाराष्ट्रीतील पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पेक्षाही छोट्या शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. चीन आणि महाराष्ट्राच्या शहरांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यास महाराष्ट्रातील शहरांपेक्षा अनेक शहर चीनमध्ये छोटी आहेत. तरी देखील चीनमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. अनेक ठिकाणी प्रवासावर बंदी आणली आहे. त्यामुळे भारतानंही आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या नियमासंदर्भात आवश्यक ती कठोर पाऊलं उचलायला हवी, पाहिजे.
इतर बातम्या