बीजिंग : भारताचा शेजारी देश असलेल्या चीनमध्ये खळबळजनक घटना घडत आहेत. संरक्षण मंत्री ली शांग फू बेपत्ता झाल्याने जिनपिंग सरकार हादरलं आहे. ली शांग फू बेपत्ता होताच संरक्षण मंत्रालयातील टॉप अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. जिनपिंग यांच शासन अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आपल्या विरोधकांना दडपून टाकण्याचा जिनपिंग यांचा प्लान असू शकतो. अटक केलेल्या लोकांमध्ये संरक्षण विभागाचे प्रमुख सहभागी आहेत. बेशिस्तीच्या नावाखाली ही अटक कारवाई झाली आहे. चायना नार्थ इंड्रस्ट्रीज कॉर्पोरेशनचे चेअरमन ली शिकवान, चायना एयरोस्पेस सायन्स एंड इंडस्ट्री कॉर्पोरेशनचे चेअरमन युआन जे, चायना नार्थ इंड्रस्ट्री ग्रुप कॉर्पोरेशनचे जनरल मॅनेजर चेन गुआओयिंग आणि चायना एविएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशनचे चेअरमन तान रूईसोंग यांना अटक करण्यात आली आहे.
य़ा वर्षातील ही दुसरी घटना आहे, जेव्हा चीनमधून VVIP गायब झाले आहेत. याआधी चीनचे परराष्ट्र मंत्री अचानक बेपत्ता झाले होते. या सगळ्यामागे जिनपिंगच आहेत, असं जिनपिंग यांना ओळखणाऱ्या लोकांचा दावा आहे. चीनचे राष्ट्रपती शीन जिनपिंग आपल्या मार्गातून निकटवर्तीयांना हटवण्यासाठी बदनाम आहेत. चीनच्या या हुकूमशाहने आपल्या अनेक निकतवर्तीयांना अशा प्रकारे मार्गातून हटवलं आहे. भविष्यात सत्तेला आव्हान देऊ शकणाऱ्यांना जिनपिंग मार्गातून हटवतात.
संरक्षण मंत्री शेवटचे कधी दिसलेले?
29 ऑगस्ट रोजी ली शांग फू शेवटचे दिसले होते. त्यांनी बीजिंगमध्ये चीन-आफ्रिकी फोरमच्या मंचावरुन भाषण दिलं होतं. 29 ऑगस्टच्या संध्याकाळपासून ली शांग फू यांच्याबद्दल काही माहिती नाहीय. ली शांग फू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. चीनचे संरक्षण मंत्री बनण्याआधी ली शांग फू सैन्य उपकरण विकास विभागाचे मंत्री होते. ते संरक्षण मंत्री झाल्यानंतर विभागीय चौकशी सुरु झाली. तपासात ली शांग फू यांनी नियम मोडल्याच निष्पन्न झालं. चीनच्या संरक्षण मंत्र्यांना खास उद्देशाने गायब करण्यात आलय, असं बोलल जातय.