नवी दिल्ली – पूर्व लडाखच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC)चीनने भारतीय सैन्याला (Indian Army) चिडवणारी कुरापत केली आहे. या ठिकाणी चीनकडून (China)युद्धाभ्यास करण्य़ात येतो आहे. यात एक लढाऊ विमान आपल्या सैन्याजवळून गेले, आपले हवाईदल सक्रिय झाल्यानंतर हे एयरक्राफ्ट निघून गेले. ही घटना जूनच्या अखेरीस झाल्याचे सांगण्यात येते आहे. माध्यमांना या सगळ्याची माहिती शुक्रवारी मिळाली आहे. या घटनेनंतर भारताने चीनसमोर याबाबत नाराजी आणि हरकत व्यक्त केली आहे. सोबतच भविष्यात असा प्रकार घडू नये असा इशाराही दिलेला आहे. खरंतर या प्रसंगामुळे चीनच्या हवाई दलाने एलएसीजवळ युद्धसराव केल्याचे समोर आले आहे. या युद्ध सरावात हवाई सुरक्षा हत्यारांचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याची माहिती आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात चीनचे एक विमान एलएसीवर तैनात असलेल्या भारतीय सैन्यदलाच्या सैनिकांच्या अगदी जवळ आले होते. रडारवर चिनी विमान दिल्यासनंतर लगेचच प्रत्युत्तरादाखल भारतीय हवाई दलही एक्टिव्ह झाले. हवाई दलाने ही घुसखोरी समजत, चिनी विमानाला पाडण्य़ासाठी क्षेपणास्त्र कार्यान्वित करण्यात आली. मात्र भारतीय सैन्याच्या इशाऱ्यानंतर चिनी एयरक्राफ्ट माघारी परतले.
भरातीय सैन्याच्या वतीने नियमानुसार पहिल्यांदा हा मुद्दा चिनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये, अशी ताकीदही देण्यात आली. या घटनेनंतर केंद्र सरकारने अशा कुठल्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याच्या सूचना सैन्यदलाला दिल्याची माहिती आहे.
त्या दिवशी गलवानमध्ये भारतीय सैन्य आणि चिनी सैन्यावरही दबाव होता. ज्या ठिकाणी चिनी सैन्य बसले होते, तिथून त्यांनी परतावे, असे भारतीय सैन्याचे म्हणणे होते. चिनी सैन्याने ते ऐकलेही होते, मात्र त्यांच्या कुरापतीनेच संघर्षाला सुरुवात झाली. चीनने तरीही तिथे दोन टेन्ट लावले, जसे काही ते निरिक्षकाच्या भूमिकेत होते. जर आम्ही परतलो तर तुमच्या हालचालींवर नजर ठेवता येणार नाही, असा तर्क त्यावेळी चिनी सैनिकांकडून देण्यात आला. भारतीय सैन्याने याला विरोध केल्यानंतर चकमक झाली. चिनी सैनिकांकडे हत्यारे होती तर भारतीय सैन्य जुन्या अनुभवाच्या आधारावर तिथे होती. या चकमकीनंतर ३० जूननंतर दोन्ही देशांत चर्चा झाली आणि चीन सैन्य तिथून एक किलोमीटर अंतरावर माघारी परतले. भारतीय सैन्य त्यांच्या चौकीवर परतले. तेव्हापासून उच्चस्तरीय चर्चा सुरु असली तरी त्यावर तोडगा निघालेला नाही.