भारताच्या निखिल गुप्ता यांना चेक रिपब्लिकने अमेरिकेच्या ताब्यात दिलं आहे. चेक रिपब्लिक पोलिसांनी या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यात चेक रिपब्लिकचे पोलीस निखिल गुप्तांच अमेरिकेकडे प्रत्यार्पण करत असल्याच दिसतय. चेक रिपब्लिकचे न्याय मंत्री पावेल ब्लेजेक यांनी निखिल गुप्तांच अमेरिकेककडे प्रत्यार्पण केल्याची पुष्टी केली. निखिल गुप्ता यांच्यावर खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येच कारस्थान रचल्याचा आरोप आहे.
सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स वर एक वीडियो शेयर केला आहे. चेक रिपब्लिक पोलिसांनी लिहिलय की, “संयुक्त राज्य अमेरिकेत हत्येच कारस्थान रचल्या प्रकरणातील संशयित शुक्रवारपासून अमेरिकी न्यायपालिकेच्या ताब्यात आहे” प्राग चेक रिपब्लिकची राजधानी विमानतळावरुन निखिल गुप्ताच सुरक्षितरित्या प्रत्यार्पण करण्यात आलं.
चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती
“3 जूनला मी निर्णय घेतला, त्यानुसार भारतीय नागरिक निखिल गुप्ताला 14 जूनला गुन्हेगारी खटला चालवण्यासाठी अमेरिकेकडे सुपूर्द करण्यात आलं” असं चेक रिपब्लिकचे न्याय मंत्री पावेल ब्लेजेक यांनी एक्स वरील पोस्टमध्ये म्हटलय. अमेरिकी न्याय विभागाच्या प्रत्यर्पण आदेशानुसार, निखिल गुप्ताला 30 जून 2023 रोजी प्राग विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलय की, त्यांनी चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती स्थापन केली आहे.
पन्नूकडे दोन देशांची नागरिकता
चेक संवैधानिक न्यायालयाने मे महिन्यात निखिल गुप्ताच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली होती. त्याने अमेरिकी कोर्टात स्वत:ला निर्दोष म्हटलं आहे. निखिल गुप्तावर गुरपतवंत सिंह पन्नूचा न्यू यॉर्कमध्ये हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. अमेरिकी सरकारच्या विनंतीवरुन त्याला चेक रिपब्लिकमध्ये अटक करण्यात आली. गुरपतवंत पन्नूकडे अमेरिका आणि कॅनडा दोन्ही देशांची नागरिकता आहे.
#WATCH | Visuals of Nikhil Gupta who was extradited to the US
Nikhil Gupta, an Indian national is accused by the United States of being involved in a murder-for-hire plot against Sikh separatist Gurpatwant Singh Pannun.
(Source: Czech police via Reuters) pic.twitter.com/r8IHL42v2s
— ANI (@ANI) June 18, 2024
अमेरिकी कोर्टात काय घडलं?
अमेरिकेकडे प्रत्यर्पण केल्यानंतर निखिल गुप्ताला न्यू यॉर्कच्या एका फेडरल कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात निखिलने स्वत:ला निर्दोश म्हटलय, असं त्याचे वकील जेफरी चैब्रोवे म्हणाले. अमेरिकी फेडरल प्रॉसीक्यूटर्सचा आरोप आहे की, गुप्ता एक अज्ञात भारतीय सरकार अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावर काम करत होता. भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत.