नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अवकाशात जाऊन जवळपास दोन महिने झाले आहेत. पण अजून ते माघारी आलेले नाहीत. त्यांना परत आणण्यासाठी विलंब होत आहे. नासाने जाहीर केले आहे की, सुनीता विल्यम्स यांना फेब्रुवारी 2025 पर्यंत आणले जाऊ शकते. बोईंग स्टारलाइनर 5 जून 2024 रोजी पहिल्या मानवयुक्त यानाने अवकाशात गेले होते. दोघे ही अंतराळवीर सात दिवसांनी परतणार होते. पण काही तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा परत येणाचा काळ पुढे ढकलला गेला आहे. नासाने म्हटले आहे की आता अंतराळवीरांना बोईंग स्टारलाइनरऐवजी स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगनसह पृथ्वीवर परतावे लागेल.
नासाच्या दोन्ही अंतराळवीर यांचा अंतराळात राहण्याचा कालवधी वाढला आहे. अशा स्थितीत एवढ्या मोठ्या मोहिमेचा अंतराळवीरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होईल याची चिंता शास्त्रज्ञांना आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हा जगातील सर्वात महागडा प्रकल्प आहे. ज्याच्या निर्मितीसाठी $150 अब्ज खर्च आला आहे. अंतराळ स्थानकावर राहण्याची सुविधा, झोपण्यासाठी क्वार्टर आणि अगदी जिम देखील आहे. पण पृथ्वीच्या तुलनेत इथली सुरक्षा नेहमीच आव्हानात्मक राहिली आहे.
अंतराळ स्थानक हे पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर पृथ्वीभोवती फिरत असते. त्यात राहणारे लोक हानिकारक सौर विकिरणांपासून सुरक्षित नाहीत. त्याच्या कक्षेदरम्यान, अंतराळ स्थानक दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळील एका बिंदूमधून जाते, जेथे किरणोत्सर्ग पृथ्वीच्या तुलनेत 30 पट जास्त आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर या अंतराळवीरांना एका आठवड्यात तितक्या रेडिएशनचा सामना करावा लागतो जितका एखाद्या व्यक्तीने पृथ्वीवर अनुभवला असेल. इंडिया टुडेच्या अहवालानुसार, अंतराळवीरांना 50 ते 20000 मिली-सिव्हर्ट (mSv) किरणोत्सर्गाचा सामना करावा लागतो. मिली-सिव्हर्ट हे रेडिएशन मोजण्याचे एकक आहे. तुलनेसाठी, 1 मिली-सिव्हर्ट तीन छातीच्या एक्स-रे रेडिएशनच्या समतुल्य आहे.
अंतराळवीरांना 150-6000 छातीचा एक्स-रे रेडिएशनचा अनुभव येईल. या किरणोत्सर्गाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास कर्करोग होऊ शकतो. ऊतींचा नाश करण्याबरोबरच मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते. याशिवाय सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात राहणे देखील अंतराळवीरांना हानी पोहोचवू शकते. मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये राहिल्याने हाडे आणि स्नायूंना नुकसान होऊ शकते. गुरुत्वाकर्षणामुळे आपल्या शरीरातील द्रव खालच्या भागात जातो. ही परिस्थिती संतुलित करण्यासाठी शरीरात अनेक व्यवस्था आहेत. पण जेव्हा गुरुत्वाकर्षण नसते तेव्हा आपल्या शरीरातील बहुतेक द्रव वरच्या भागात जाते. त्यामुळे अंतराळवीरांच्या चेहऱ्यावर सूज येते.
अंतराळात राहिल्याने अंतराळवीरांवर शारीरिक तसेच मानसिक प्रभाव देखील पडतो. जेव्हा परिस्थिती बोइंग स्टारलाइनरसारखी असते. कारण अंतराळवीर 8 दिवसात परततील असे गृहीत धरले होते. पण त्यांना आता 8 महिने इथे राहावे लागणार आहे. याशिवाय पृथ्वीपासून ४०० किमी वर मोजक्या लोकांसोबत राहणे हे मोठे आव्हान आहे. आपण कधी एकटा राहण्याचा विचार देखील करु शकत नाहीत.