इस्तांबुल (तुर्की) : मुक्या प्राण्यांना जीव लावला तर ते त्यापेक्षा दुप्पटपटीने आपल्याला जीव लावतात. माणसासोबतची मैत्री एकवेळ मनस्ताप देईल, स्वार्थी ठरेल. मात्र, मुक्या प्राण्यांसोबतची निस्वार्थ मैत्री ही जगात कोणत्याच व्यक्तीकडून मिळणार नाही. याच मैत्रीचं ताजं उदाहरण तुर्कीच्या इस्तांबुल शहरात बघायला मिळालं आहे. इस्तांबुलचे रहिवासी सेनतूर्क हे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. ते रुग्णालयात दाखल होण्याच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचा कुत्रा रुग्णालयाच्या गेटवर त्यांची वाट बघत बसला होता (Dog spent many days outside hospital waiting for its owner).
सेनतूर्क आजारी पडल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे त्यांना रुग्णालयात नेलं गेलं. त्यांचा कुत्रा हा देखील रुग्णवाहिकेच्या मागे धावत होता. सेनतूर्क यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा कुत्रा रुग्णालयाच्या गेटवर थांबला. तो दिवस-रात्र आपल्या मालकाची वाट बघत होता (Dog spent many days outside hospital waiting for its owner).
या दरम्यान, सेनतूर्क यांची मुलगी कुत्र्याला घरी घेवून गेली. मात्र, कुत्रा घरी थांबला नाही. तो परत रुग्णालयाच्या गेटवर आला. तो काही दिवस गेटवर राहूनच आपल्या मालकाची वाट बघत राहिला. अखेर दोन दिवसांपूर्वी सेनतूर्क यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. सेनतूर्क यांना रुग्णालयातून बाहेर येताना बघून कुत्र्याला आनंद गगणात मावेसाना झाला. तो सेनतूर्क यांच्या आजूबाजूला फिरु लागला. त्यांना मिठी मारण्यासाठी पुढे जाऊ लागला. आपला लाड करु करु लागला.
सेनतूर्क आता घरी गेले आहेत. त्यांची प्रकृती आता चांगली आहे. त्यांच्या कुत्र्याने रुग्णालयाबाहेर पाहिलेली वाट ही जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. जगभरात कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांकडून कुत्र्याचं कौतुक केलं जात आहे. आएएस सुप्रीया शाहू यांनी ट्विटरवर याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.
This adorable dog walks to the hospital every day and sits outside, waiting to see his hospitalised owner. Look at his reaction when he gets the chance to see him. Credits -CBS News pic.twitter.com/wl3j1W0acR https://t.co/wl3j1W0acR
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) January 22, 2021
हेही वाचा : ना भाजप, ना सेना, ना स्वाभिमानी, हातकणंगलेत जनसुराज्यचा सभापती, नाट्यमय घडामोडी