अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलेनियासोबत समर्थकांमध्ये पोहोचले आहेत. इथे डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. हा इतिहासातील महान राजकीय क्षण असल्याच ट्रम्प यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प मतदारांना संबोधित करताना म्हणाले की, “आम्ही मतदारांसाठी सर्व काही ठीक करणार आहोत. हा एक राजकीय विजय आहे. असा विजय आपल्या देशाने कधी पाहिलेला नाही. 47 वा राष्ट्रपती म्हणून प्रत्येक दिवस तुमच्यासाठी लढेन. हा अमेरिकेचा शानदार विजय आहे. अमेरिका पुन्हा एकदा महान राष्ट्र बनेल” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अमेरिकेचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जेडी वेंस यांनी सुद्धा रिपब्लिकन पार्टीच्या मतदारांना संबोधित केलं. “मी शुभेच्छा देतो. अमेरिकेच्या इतिहासात महान राजकीय पुनरागमन झालं आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वात मोठं आर्थिक पुनरागमन आहे” जेडी वेंस यांनी आपल्या क्षेत्रात विजय मिळवला आहे.
मस्कच कौतुक करताना ट्रम्प काय म्हणाले?
“लोकांनी अमेरिकेत परत आलं पाहिजे पण कायदेशीररित्या. इथे उपस्थित असलेला प्रत्येकजण खास आणि महान आहे” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्कच कौतुक केलं. “मस्क कमालीचा माणूस आहे. एलॉन मस्कने जे करुन दाखवलं, ते रशिया करु शकतो का?. चीन करु शकतो का?. कोणी अन्य असं करु शकत नाही” त्यांनी स्पेस एक्सच्या लॉन्चच सुद्धा कौतुक केलं. अमेरिकन बॉर्डर सुरक्षित करण्याचा मुद्दा ट्रम्प यांनी पुन्हा मांडला.