अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय पक्का झाला आहे. अमेरिकेत होत असलेल्या या बदलाचा इराणवर खूप वाईट परिणाम होत असल्याच दिसत आहे. इराणची करन्सी आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तराला जाऊन पोहोचली आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय हा इराणसाठी चांगले संकेत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मागच्या कार्यकाळातही इराणवर अनेक प्रतिबंध लादले होते. ते इस्रायलचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी खुर्ची संभाळताच इराणचे वाईट दिवस सुरु झालेत. इराणची मुद्रा रियाल बुधवारी आतापर्यंतच्या आपल्या सर्वात खालच्या स्तराला पोहोचली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात सत्तेवर येताच इराण विरुद्ध अनेक पावलं उचलली होती. इराणने 2015 साली अमेरिकेसोबत अणवस्त्र करार केला होता. ट्रम्प यांनी 2018 साली तो करार मोडला. इराणवर कठोर प्रतिबंध लादले. त्यांची आर्थिक स्थिती कमजोर केली. 2015 साली एका डॉलरच्या तुलनेत इराणी रियालचा दर 32,000 डॉलर होता. नुकत्याच आलेल्या निकालानंतर एका डॉलरच्या तुलनेत रियालचा दर 7,03,000 पर्यंत पोहोचला आहे.
Iran’s rial weakened to a record low against the dollar, having lost about 27% of its value this year.
Shares on the Tehran Stock Exchange have also fallen in recent days, according to reports by state media.https://t.co/SApah0DDhq via @golnarM pic.twitter.com/Boy2IbxY3e— Stuart Wallace (@StuartLWallace) November 5, 2024
आता इस्रायल काय करणार?
सध्या अमेरिकेचा जवळचा सहकारी इस्रायलची गाजामध्ये हमास आणि लेबनानमध्ये हिज्बुल्लाहसोबत लढाई सुरु आहे. तिथे अमेरिका सैन्य आणि आर्थिक बळावर इस्रायलची मदत करत आहे. इराणने इस्रायलभोवती दहशतवादी गटांच जाळ उभारलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान युद्ध थांबवण्याच आश्वासन दिलं आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार ट्रम्प यांच्या विजयानंतर इस्रायलला रोखणं कठीण होऊन बसेल. त्यामुळे मध्य पूर्वेत मोठ नुकसान होईल.