तैवानला आज शक्तीशाली भूकंपाचा धक्का बसला. संपूर्ण बेट या भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. अनेक इमारती कोसळल्या. तैवानच्या भूकंपामुळे जापानलाही धोका निर्माण झाला आहे. जापानच्या दक्षिणेकडील ओकिनावासाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. इथून उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. फिलीपीन्सला सुद्धा त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. किनारपट्टीचा भाग रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जापानाच्या हवामान विभाग एजन्सीने भूकंपानंतर 3 मीटर (9.8 फिट) उंचीच्या त्सुनामीच्या लाटा उसळतील अशी भविष्यवाणी केली आहे.
तैवानच्या भूकंप मापन यंत्रणेने भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल असल्याच सांगितलं. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने हा 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप असल्याच सांगितलं. भूकंपाचा केंद्र बिंदू हुआलिन शहरापासून जवळपास 18 किलोमीटर दक्षिणेला आहे. हुआलिनमध्ये इमारतींचा पाया ढासळला. भूकंपाचे धक्के राजधानी ताइपेमध्ये जाणवले.
मागच्या 25 वर्षातील हा शक्तीशाली भूकंप
भूकंपामुळे तैवानच्या हुआलिनमध्ये अनेक इमारती कोसळल्या. मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. स्पीड ट्रेनची सर्विस थांबवण्यात आलीय. अंडरग्राउंड रेलवे स्टेशन्समधून लोकांना बाहेर काढण्यात आलं. मागच्या 25 वर्षातील तैवानमधील हा शक्तीशाली भूकंप आहे.
अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने काय म्हटलय?
अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार (यूएसजीएस) बुधवारी तैवानचा पूर्व किनारा 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भूकंपामुळे दक्षिण जापानामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. पूर्वोत्तरच्या यिलान काउंटी आणि उत्तरेत मियाओली काऊंटीमध्ये भूकंपाची तीव्रता 5+ नोंदवण्यात आलीय. उत्तरेच्या ताइपे शहर, न्यू ताइपे शहर, ताओयुआन शहर आणि सिंचू काऊंटी, ताइचुंग शहर, चांगहुआ काउंटी मध्ये 5+ तीव्रतेचा स्तर नोंदवण्यात आलाय.
#WATCH | An earthquake with a magnitude of 7.2 hit Taipei, the capital of Taiwan.
(Source: Reuters) pic.twitter.com/SkHBHrluaZ
— ANI (@ANI) April 3, 2024
नागरिकांना उंचावरील सुरक्षित स्थळी जाण्याची विनंती
भूकंपामुळे ताइपे, ताइचुंग आणि काऊशुंगमध्ये मेट्रो सिस्टिम बंद करण्यात आली. दक्षिण-पश्चिमी जापानच्या मियाकोजिमा, येयामा क्षेत्राच्या तटीय प्रदेशात ओकिनावा प्रांतामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. एनएचके रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी या क्षेत्रातील नागरिकांना उंचावरील सुरक्षित स्थळी जाण्याची विनंती केली आहे.