Sunita Williams SpaceX : अंतराळवीरांना पहिल्यांदाच अवकाशात घेऊन गेलेल्या बोईंगच्या स्टार लायनरला तगडा झटका बसला आहे. या अवकाश यानातून भारतीय अमेरिकन वंशाची अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर अवकाशात गेले होते. ते तिथेच अडकून पडले आहेत. नॅशनल एयरोनॉटिक्स एंड स्पेस एडमिनिस्ट्रेशनने (NASA) भारतीय-अमेरिकन अंतराळवीर आणि तिच्यासोबत असलेले एस्ट्रोनॉट बुच विल्मोर यांच्या भवितव्याचा निर्णय घेतला आहे. अवकाशात अडकलेल्या या दोन्ही अंतराळवीरांना एलन मस्कची कंपनी स्पेसएक्सच्या Crew 9 मिशनद्वारे पृथ्वीवर परत आणण्यात येईल, अशी घोषणा अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने केली आहे. बोईंगच्या स्टारलायनरने दोघांना पृथ्वीवर आणण्याचा विचार नासाने सोडून दिला आहे. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर 5 जूनला बोईंगच्या स्टारलायनर कॅप्सूलमधून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी (ISS) रवाना झाले होते. 6 जूनला हे दोघे स्पेस स्टेशनवर पोहोचले. हे मिशन केवळ 8 दिवसांच होतं. आठवड्यभराने दोघे पृथ्वीवर परतणार होते. पण स्टारलायनरचे थ्रस्टर्स फेल झाले आणि हीलियम गॅस लीक झाल्यामुळे त्यांचं पृथ्वीवर परतण शक्य झालं नाही.
नासा आणि बोईंग दोघांनी स्टारलायनरनेच दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. पण स्टारलायनरला असलेला धोका लक्षात घेऊन नासाने अखेर एलन मस्कच्या स्पेसएक्सवरच विश्वास दाखवला. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर परत येतील. स्टारलायनरच्या जागी स्पेसएक्स ड्रॅगनमधुन दोघे पृथ्वीवर पाऊल ठेवतील. बोईंगच्या स्टारलायनरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, ही गोष्ट लक्षात येते. पण विलियम्स आणि विल्मोरला परत आणण्यासाठी नासाने स्पेसएक्सची निवड का केली? तुमच्या मनातही हा प्रश्न असू शकतो. एलन मस्कची स्पेसएक्स कंपनी निवडण्यामागे अनेक कारणं आहेत. त्याआधी काही गोष्टी जाणून घ्या.
या दोन खासगी कंपन्यांना किती अब्ज डॉलरच कॉन्ट्रॅक्ट मिळालं?
नासा पृथ्वीची जी खालची कक्षा आहे, त्या ऑर्बिटच्या मिशनसाठी सरकारी मिशन्सना प्राधान्य देत नाहीय. त्याऐवजी कमर्शियल क्रू मिशन्सना प्राधान्य दिलं जातय. 2014 मध्ये अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि तिथून परत आणण्यासाठी नासाने दोन प्रायवेट स्पेस कंपनी बोईंग आणि स्पेसएक्सची निवड केली होती. स्पेसएक्सला 2.6 अब्ज डॉलरच कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि बोईंगला 4.2 अब्ज डॉलर्सच कॉन्ट्रॅक्ट मिळालं. स्पेसएक्सने 2020 साली आपल्या मिशन्सची सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत स्पेसएक्सने स्पेस स्टेशनवर 11 क्रू पाठवले आहेत. यात 8 नासासाठी आणि 3 प्रायवेट कंपनी एक्सिओम स्पेससाठी आहेत. एक्सिओम कंपनी लोकांना अवकाशातील सफर घडवून आणते. ही कंपनी स्पेस ट्रॅव्हलची सेवा देते.
कमर्शियल क्रू मिशन म्हणजे काय?
कमर्शियल क्रू मिशन म्हणजे खासगी सेक्टरमधील कंपन्या आपल्या स्पेसक्रॉफ्टने अंतराळवीरांना अवकाशात पाठवतात. स्पेसएक्स त्यासाठी ‘Dragon’ स्पेसक्रॉफ्टचा वापर करते. बोईंगने ‘Starliner’ स्पेसक्रॉफ्ट बनवलं आहे. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर याच स्टारलायनरने स्पेसमध्ये गेले होते. दोघे स्टारलायनर टेस्ट क्रू फ्लाइटचा भाग आहेत. स्टारलायनरच अवकाशातील हे पहिलच उड्डाण होतं.
कोण पुढे निघून गेलं?
अंतराळवीरांसोबत स्टारलायनरच हे पहिलच उड्डाण फेल गेलय. कारण हे स्पेसक्रॉफ्ट दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यात सक्षम नाहीय. त्यामुळे एलन मस्कची कंपनी स्पेसएक्सला स्पेस सेक्टरमध्ये स्वत:ची विश्वसनीयता वाढवण्याची संधी मिळाली आहे. बोईंग आणि स्पेसएक्समध्ये जी स्पर्धा आहे, त्यात स्पेसएक्स पुढे निघून गेलीय.
आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर आधीपासून किती स्पेसक्रॉफ्ट आहेत?
नासाने एलन मस्कच्या स्पेसएक्सवर का विश्वास दाखवला? यामागे नाईलाज किंवा स्पेसएक्सने मिळलेलं यश तुम्ही म्हणू शकता. नाईलाज यासाठी कारण स्पेस स्टेशनवर मर्यादीत प्रमाणात तुम्ही स्पेसक्रॉफ्ट डॉक करु शकता. सध्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (ISS) आधीपासूनच सहा स्पेसक्रॉफ्ट आहेत. यात Boeing Starliner च स्पेसक्रॉफ्ट, SpaceX Dragon Endeavour स्पेसक्रॉफ्ट, Northrop Grumman रीसप्लाय शिप, Soyuz MS-25 क्रू शीप आणि Progress 88 आणि 89 रीसप्लाय शिप आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात क्रू-9 मिशनतंर्गत स्पेसएक्सच ड्रॅगन स्पेस स्टेशनवर डॉक म्हणजे उतरणार आहे. म्हणून नासाकडे स्पेसएक्स ड्रॅगनचाच ऑप्शन आहे.
Crew-8 आणि Crew-9 काय मिशन आहे?
बोईंगच स्टारलायनर अंतराळवीरांशिवाय पृथ्वीवर परत येणार आहे. स्पेसएक्स ड्रॅगन एंडेवरवर Crew-8 चे अंतराळवीर आहेत. यावर्षी सप्टेंबर महिन्यात रोटेशनतंर्गत Crew-9 मिशन अंतराळवीरांना स्पेस स्टेशनवर घेऊन जाईल ते Crew-8 ची जागा घेतील. क्रू-8 चे अंतराळवीर पृथ्वीवर येतील आणि क्रू-9 चे अंतराळवीर स्पेस स्टेशनची जबाबदारी संभाळतील. क्रू-9 मिशन अंतर्गत चार अंतराळवीरांना स्पेस स्टेशनवर जायचं होतं. पण आता विलियम्स आणि विल्मोर यांना परत आणण्यासाठी दोनच अंतराळवीर स्पेस स्टेशनवर जातील. विलियम्स आणि विल्मोर क्रू-9 च्या टीमसोबत काम करतील. या मिशनमधील अंतराळवीर फेब्रुवारी 2025 पर्यंत स्पेस स्टेशनवर असतील. दोन्ही एस्ट्रोनॉट्स फेब्रुवारी 2025 मध्ये क्रू-9 सदस्यांसोबत पृथ्वीवर परत येतील.
SpaceX Dragon vs Boeing Starliner
क्रू-9 मिशनसाठी स्पेसएक्स ड्रॅगन स्पेसक्रॉफ्टचा वापर केला जाईल. याच स्पेसक्रॉफ्टने स्टारलायनरचे एस्ट्रोनॉट्स- विलियम्स आणि विल्मोर पृथ्वीवर परतणार आहेत. स्टारलायनर आणि ड्रॅगनच्या स्पेसक्रॉफ्टमध्ये काय फरक आहे? समजून घेऊया.
बोईंग स्टारलायनरची खासियत काय? (CST-100)
बोईंगच्या स्पेसक्रॉफ्टमध्ये पुन्हा वापरता येणारी कॅप्सूल आणि एक एक्सपेंडेबल सर्विस मॉड्यूल आहे. पृथ्वीच्या खालच्या कक्षेतील ऑर्बिट मिशनसाठी हे स्पेसक्रॉफ्ट डिजाइन केलय.
कॅप्सूलचा डायमीटर 15 फूट आहे. चंद्रावर जाणाऱ्या अपोलो कमांड मॉड्यूल आणि स्पेसएक्सपेक्षा थोडं मोठं आहे. पण आर्टेमिस ओरियन कॅप्सूलपेक्षा थोडं छोटं आहे. आर्टेमिस ओरियनला अवकाशात बरच पुढे जाण्यासाठी डिजाइन करण्यात आलं आहे. स्टारलायनरमधून सात लोक जाऊ शकतात.
स्टारलायनरमध्ये जुन्या पद्धतीच कॉकपीट आहे. यात फिजिकल बटन आणि स्विच आहे. स्पेसक्रॉफ्टचा अनुभव असलेल्या अंतराळवीरांना एक फॅमेलियर इंटरफेस मिळतो.
बोईंगची सब्सिडियरी कंपनी स्पेक्ट्रोलॅबचे सोलर सेल सर्विस मॉड्यूलच्या मागच्या भागात लावण्यात आले आहेत. यातून 2.9 किलोवॅट वीज बनते. सर्विस मॉड्यूलमध्ये हायपरगोलिक प्रोपेलेंटवाले चार रॉकेटडाइन RS-88 इंजिन आहे. याचा वापर लॉन्च फेल झाल्यास स्वत:ला वाचवण्यासाठी केला जातो.
स्टारलायनरला 2,500 किलोग्रॅम पर्यंतचा दबाव असलेला कार्गो आणि 1,500 किलोग्रॅम दबाववाला कार्गो पोहोचवण्यासाठी डिजाइन करण्यात आलं आहे.
स्टार लायनर स्पेसक्रॉफ्टने अंतराळवीरांशिवाय दोनदा टेस्ट फ्लाइट पूर्ण केलीय. ऑर्बिटल फ्लाइट टेस्ट 1 (OFT-1) आणि ऑर्बिटल फ्लाइट टेस्ट 2 (OFT-2). डिसेंबर 2019 मध्ये OFT-1 ला सॉफ्टवेयरशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागला होता. मे 2022 मध्ये OFT-2 ने नायट्रोजन टेट्रॉक्साइड इंटरॅक्शनमुळे वॉल्वची समस्या सोडवल्यानंतर स्पेस स्टेशनवर यशस्वीरित्या डॉक केलं होतं.
स्पेसएक्स क्रू ड्रॅगनच वैशिष्ट्य काय?
स्पेसएक्सच्या स्पेसक्रॉफ्टने आधीच अंतराळवीरांशिवाय आणि अंतराळवीरांसह दोन्ही प्रकारची उड्डाण केली आहेत. अंतराळवीरांशिवाय पहिला टेस्ट फ्लाइट डेमो 1 मार्च 2019 मध्ये झाला. ISS म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर हे स्पेसक्रॉफ्ट यशस्वीरित्या उतरलं. अंतराळवीरांसह पहिल्या फ्लाइटबद्दल बोलायच झाल्यास डेमो-2 मे 2020 मध्ये क्रू टीम स्पेस स्टेशनवर पोहोचलेली.
2011 मध्ये स्पेस शटल प्रोग्रॅम संपल्यानंतर अमेरिकेच हे पहिलं क्रू ऑर्बिटल लॉन्च होतं. म्हणून नासाने सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी स्पेसएक्स ड्रॅगनची निवड केली आहे. स्पेसएक्सच यान सप्टेंबर महिन्यात क्रू ला स्पेस स्टेशनवर घेऊन जाणार आहे. ड्रॅगन याआधी अनेकदा अंतराळवीरांना अवकाशात घेऊन गेलय आणि तिथून सुरक्षित पुन्हा पृथ्वीवर आणलय. स्पेसएक्सच्या क्रू-9 ड्रॅगनच रोटेशन क्रू मिशन अंतर्गत अंतराळवीरांसह हे नवव मिशन आहे. यातून स्पेसएक्स ड्रॅगनची विश्वसनीयता दिसून येते.