युरोपातील देशांचा वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, आणि त्याचे गंभीर परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागू शकतात. जगभरातील थंड प्रदेशात घरं गरम ठेवण्यासाठी आणि कारखाने चालवण्यासाठी नैसर्गिक वायूंचा वापर केला जातो. कोळशावरची निर्भरता कमी करण्यासाठी जगभरात स्वच्छ उर्जा स्त्रोतांचा वापर केला जात आहे. त्यामुळेच जगभरात कोळशाला नैसर्गिक वायूचा पर्याय दिला जात आहे. त्यातच रशिया असा एक देश आहे, ज्याने नैसर्गिक वायूचा साठा करुन ठेवला आहे. ( europe-energy-crisis-is-covering-rest-of-the-world-as-natural-gas-prices-increase-india impact )
त्यातच युरोपमधील उर्जा संकट जगासाठी अडचणीचे ठरू शकते, कारण युरोपातील अनेक देशांच्या सरकारांनी ऊर्जेच्या कमतरतेमुळे ब्लॅकआउटचा इशारा दिला. यामुळे कारखानेही बंद ठेवावे लागू शकतात. रशिया आणि नॉर्वेकडून पाइपलाइनद्वारे नैसर्गिक वायुचा प्रवाह मर्यादित आहे. शिवाय, बदलेल्या हवामानामुळे पवन उर्जेचे उत्पादनही कमी झालं आहे. हेच नाही तर युरोपातील आण्विक उर्जा निर्मिती प्लांटचं आयुष्य संपलं आहे आणि बरेच प्लांट आला बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळेच युरोपात वीज खंडित होण्याचा धोका वाढत आहे.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता
युरोपात गॅसच्या किंमती गेल्या वर्षभरात तब्बल 500 टक्क्यांनी वाढल्या आहेत. हा आतापर्यंतचा किंमतींचा विक्रम आहे. नैसर्गिक गॅसमध्ये होणाऱ्या वाढीमुळे युरोपातील खत उत्पादक कंपन्याही आपल्या खतांच्या किंमती वाढवत आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चावर झाला आहे. परिणामी, उत्पादन खर्च वाढला तर शेतमालाचे भाव वाढणार, ज्याचा थेट परिणाम जागतिक अन्न महागाईच्या रुपाने दिसू शकतो. यूकेमध्ये ऊर्जेच्या वाढलेल्या किंमतींमुळे अनेक पुरवठादारांनी व्यवसाय बंद केले आहेत.
इंधन घेऊ शकत नसलेल्या देशांना अडचणीला सामोरे जावे लागेल
चीनमधील सिरेमिक, ग्लास आणि सिमेंटच्या उत्पादकांसह औद्योगिक वस्तू निर्माण करणारे कारखाने त्यांच्या उत्पादनांच्या किंमती वाढवू शकतात. त्यातच ज्या देशांना आता इंधन आयात करणं अवघड जात आहे, त्यांची परिस्थिती तर दयनिय होऊ शकते. जसं की पाकिस्तान आणि बांग्लादेश. युरोपातील उर्जा संकटाचे गंभीर परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: