Heat Wave: युरोप उष्णतेने होरपळला, पोर्तुगाल, फ्रान्समध्ये पारा 40 डिग्रीच्या पार, इंग्लंडमध्ये रेड अलर्ट, हीट व्हेवमुळे 900 जणांचा मृत्यू

| Updated on: Jul 17, 2022 | 8:48 PM

पोर्तुगालमध्ये उष्णतेने नागरिक हैराण झालेले आहेत. थोडी तापमानात सुधारणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी आगीच्या आणि उष्णतेच्या ज्वाळा सुरुच आहेत. गेल्या काही दिवसांत 650 जणांचा उष्णतेच्या लाटेने मृत्यू झाल्याची माहिती पोर्तुगिज आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Heat Wave: युरोप उष्णतेने होरपळला, पोर्तुगाल, फ्रान्समध्ये पारा 40 डिग्रीच्या पार, इंग्लंडमध्ये रेड अलर्ट, हीट व्हेवमुळे 900 जणांचा मृत्यू
Heat wave in Europe
Image Credit source: social media
Follow us on

लंडन – युरोपीय देश (Europe)सध्या भीषण उष्णतेला सामोरे जात आहेत. इंग्लंडमध्ये (England)तर आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात रेड अलर्ट (Red Alert)जारी करण्यात आला आहे. लोकांनी उष्णतेपासून सावध राहावे, सावधगिरीच्या उपाययोजना कराव्या असे सांगण्यात आले आहे. पोर्तुगाल, फ्रान्स, स्पेन आणि क्रोशिया सारख्या देशांमध्ये जंगलांमध्ये वणवे लागले आहेत. त्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होते आहे. जयवायू परिवर्तन हे या उष्णतेचे कारण सांगण्यात येते आहे. इंग्लंडमध्ये 25 जुलै 2019 रोजी सर्वाधिक तापमानाची नोंद 38.7 डिग्री सेल्सियस करण्यात आली होती. आता हवामान विभागाने हा रेकॉर्ड तुटल्याचे जाहीर केले आहे. तापमान 40 डिग्री सेल्सियसच्या पार जात असल्याचे सांगण्यात येते आहे. गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन अनेकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात येते आहे. अनेक ठिकाणी बचाव पथके तैनात करण्यात आली असून ते नागरिकांना दुसऱ्या सुरक्षित स्थळी पोहचवत आहेत.

1. पोर्तुगाल

पोर्तुगालमध्ये उष्णतेने नागरिक हैराण झालेले आहेत. थोडी तापमानात सुधारणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी आगीच्या आणि उष्णतेच्या ज्वाळा सुरुच आहेत. गेल्या काही दिवसांत 650 जणांचा उष्णतेच्या लाटेने मृत्यू झाल्याची माहिती पोर्तुगिज आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 7ते 13 जुलैच्या काळात दर 40 मिनिटांची एका व्यक्तीचा उष्णतेने मृत्यू होतो आहे. येत्या काही काळात तापमान सात ते आठ डिग्रीने कमी येईल, अशी आशा आहे.

स्पेनमध्ये आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर

2. स्पेन

स्पेनमध्ये निरनिराळ्या 30 ठिकाणी जंगलात वणवे पेटलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून 40 अंश तापमानापेक्षा जास्त पारा आहे. 10 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान 360 जणांचा या उष्णतेने बळी घेतला आहे. आत्तापर्यंत लागलेल्या आगीमुळे 14 हजार हेक्टर जमिनीवरील जंगल नष्ट केलेले आहे.

इटलीतील प्रसिद्ध नदीचे पात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर

3. इटली

उष्णतेमुळे पावसावरही परिणाम झालेला आहे. पो नावाची सर्वाधिक लांब असलेली नदी पाऊसच न झाल्याने आता कोरडी पडत चालली आहे. पाणी वाटप आणि बचतीसाठी सुमारे 170 नगरपालिका, महापालिकांत प्रयत्न करण्यात येत आहेत. दुष्काळाचे सावटच देशापुढे उभे ठाकलेले आहे. गाड्या धुण्यासाठी किंना उद्यांनांसाठी पाणी वापरल्यास 500 युरोंचा दंड ठोठावण्यात येतो आहे. पाण्याचा वापर केवळ अन्न, घरगुती वापर आणि आरोग्यासाठी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसासाठी प्रार्थना करण्यात येत आहेत.

उष्णतेपासून वाचवण्यासाठी 10हजार जणांना सुरक्षित स्थळी नेले

4. फ्रान्स

जंगलांना लागलेल्या आगींमुळे सुमारे 14 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सुमारे 11 हजार हेक्टरवरील जंगल नाहिसे झाले आहे. अजूनही अग्नितांडव शमलेले नाही. तापमान 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे.
<

5. इंग्लंड

आत्तापर्यंतचे सर्वाधिक तापमान असलेले दिवस येत्या काळात दिसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेवर विचार करण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. सरकारकडून नागरिकांनी सूचना आणि उपाययोजना सुचवण्यात येत आहेत.