एकेकाळी ज्याचा बोलबाला होता त्यालाच पाकिस्तानात झाली अटक, कारण काय?

| Updated on: Aug 12, 2024 | 8:28 PM

पाकिस्तानचे माजी गुप्तचर प्रमुख फैज हमीद यांना लष्कराने ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीने असा दावा केला आहे. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) हमीद यांना 2019 ते 2021 पर्यंत गुप्तचर संस्थेचे नेतृत्व करताना अत्यंत शक्तिशाली मानले जात होते. पण ते आता अटकेत आहेत.

एकेकाळी ज्याचा बोलबाला होता त्यालाच पाकिस्तानात झाली अटक, कारण काय?
Follow us on

पाकिस्तानचे माजी आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांना अटक करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) हमीद यांना 2019 ते 2021 पर्यंत गुप्तचर संस्थेचे नेतृत्व करताना अत्यंत शक्तिशाली मानले जात होते. 8 नोव्हेंबर 2023 रोजी टॉप सिटीचे मालक मोईज अहमद खान यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली तेव्हा टॉप सिटी प्रकरण चर्चेत आले. यामध्ये त्यांनी हमीद यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय. याचिकेत म्हटले आहे की, 12 मे 2017 रोजी, जनरल हमीदच्या आदेशानुसार, आयएसआयच्या अधिकाऱ्यांनी टॉप सिटीच्या कार्यालयावर आणि त्याच्या घरावर छापे टाकले आणि सोने, हिरे आणि पैशांसह मौल्यवान वस्तू जप्त केल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.

गृहनिर्माण घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोर्ट मार्शलची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्कराने सोमवारी ही माहिती दिली. निवेदनात असे म्हटले की, “पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, टॉप सिटी प्रकरणात लेफ्टनंट जनरल फैज हमीद (निवृत्त) यांच्या विरोधात केलेल्या तक्रारींची सत्यता पडताळून पाहण्यासाठी चौकशी केली जात आहे,” लेफ्टनंट जनरल फैज हमीद (निवृत्त) यांच्यावर पाकिस्तान आर्मी कायद्याच्या तरतुदीनुसार योग्य शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

फील्ड जनरल कोर्ट मार्शल प्रक्रिया सुरू

निवेदनात असे ही म्हटले आहे की, निवृत्तीनंतर पाकिस्तान आर्मी कायद्याचे उल्लंघन केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. फील्ड जनरल कोर्ट मार्शलची कार्यवाही सुरू करण्यात आली असून लेफ्टनंट जनरल फैज हमीद (निवृत्त) यांना लष्करी ताब्यात घेण्यात आले आहे.

हमीद यांच्यावर आरोप आहे की, आयएसआय अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून चार कोटी रुपयांची रोकड पळवल्याचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली आणि आरोपांची चौकशी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. यात पाकिस्तानचे सरन्यायाधीश काझी फैज इसा, न्यायमूर्ती अत्तार मिनुल्ला आणि न्यायमूर्ती अमिनुद्दीन यांचा समावेश आहे.