नवी दिल्लीः अखेर भारत बायोटेकच्या कोविड-19 लस कोवॅक्सिनला (Covaxin) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी आपत्कालीन वापरासाठी (EUL) मंजुरी दिली. WHO च्या स्वतंत्र सल्लागार समितीच्या तांत्रिक सल्लागार गट (TAG) ने कोवॅक्सिनला EUL दर्जा देण्याची शिफारस केली होती. (Finnaly Covaxin of Bharat Biotech approved by WHO)
? WHO has granted emergency use listing (EUL) to #COVAXIN® (developed by Bharat Biotech), adding to a growing portfolio of vaccines validated by WHO for the prevention of #COVID19. pic.twitter.com/dp2A1knGtT
— World Health Organization (WHO) (@WHO) November 3, 2021
WHO ने (भारत बायोटेक द्वारे विकसित) #COVAXIN ला आपत्कालीन वापर म्हणून मंजूर दिली. कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी WHO द्वारे प्रमाणित केलेल्या लसींच्या पोर्टफोलिओमध्ये सामील केले,” अशी माहिती जागतिक आरोग्य संस्थेने ट्विटमध्ये दिलीय. कोवॅक्सिन ही लस कोविड 19 च्या लक्षणाविरोधात 77.8 टक्के परिणामकारक ठरली आणि नवीन डेल्टा वेरिएंटविरोधात 65.2 टक्के संरक्षण करायला परिणामकारक ठरली आहे.
WHO’s EUL procedure assesses the quality, safety and efficacy of #COVID19 vaccines and is a prerequisite for #COVAX vaccine supply. It also allows countries to expedite their own regulatory approval to import and administer COVID-19 vaccines.pic.twitter.com/jJyS1hiz44
— World Health Organization (WHO) (@WHO) November 3, 2021
जूनमध्ये कंपनीने सांगितले की, त्यांनी फेज 3 चाचण्यांमधून कोवॅक्सिनच्या परिणामकारकतेचे अंतिम परीक्षण केले. भारत बायोटेकचे कोवॅक्सिन आणि अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे कोविशील्ड या भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्या दोन लसी आहेत.
Related News