ओमानमध्ये मशिदीजवळ गोळीबार, एका भारतीयसह 6 जण ठार

| Updated on: Jul 16, 2024 | 8:44 PM

ओमानची राजधानी मस्कत येथील एका मशिदीत झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये एका भारतीय नागरिकाचा देखील समावेश आहे.

ओमानमध्ये मशिदीजवळ गोळीबार, एका भारतीयसह 6 जण ठार
Follow us on

ओमानची राजधानी मस्कतमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये एका भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मशिदीजवळ हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. तर एक जण जखमी झाला आहे. ओमानचे परराष्ट्रमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. या गोळीबारात एकूण सहा जण ठार झाले असून त्यापैकी चार पाकिस्तानी नागरिक आहेत. ओमान पोलिसांनी माहिती देताना म्हटले की, ओमानची राजधानी मस्कत येथील वाडी कबीर भागात गोळीबार झालाय. ज्यामध्ये 30 जण जखमी झाले आहेत. पण हा हल्ला कोणी आणि का केला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

गोळीबार करणारे तीन जण होते. ज्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, “या घटनेत किमान चार पाकिस्तानी नागरिक ठार झालेत. याशिवाय 30 पाकिस्तानी रूग्णालयात उपचार घेत आहेत.”

ओमानमधील पाकिस्तानचे राजदूत इम्रान अली यांनी सांगितले की, या मशिदीला बहुतेक दक्षिण आशियातील स्थलांतरि लोकांनी भेट दिली होती. ओमानमध्ये जवळपास 4 लाख पाकिस्तानी लोकं राहतात. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितले की, या दहशतवादी हल्ल्यामुळे मला खूप दु:ख झाले आहे.

गोळीबारानंतर मस्कतमधील अमेरिकन दूतावासाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. “अमेरिकन नागरिकांनी जागरुक राहावे आणि स्थानिक बातम्यांचे निरीक्षण करावे. नागरिकांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे,” असे त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले.