बिजिंग – चीन आणि रशिया यांच्यासोबत डबल फ्रंटवर युद्ध स्थितीसाठी अमेरिका तयारी करते आहे. मात्र सध्या अमेरिकेच्या दोन्ही प्रमुख शत्रू राष्ट्रांचे मुख्य नेते हे आजारी पडले आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्या आजारपणाच्या बातम्या नुकत्याच चर्चेत होत्या. आता नव्या माहितीनुसार चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (XI Jinping) हेही आजारी आहेत. मेंदूच्या गंभीर आजाराशी ते सध्या मुकाबला करीत आहेत. या आजारावर उपचारासाठी २०२१ साली जिनपिंग यांना हॉस्पिटलमध्येही दाखल करण्यात आले होते. चीनमधील माध्यमांच्या दाव्यानुसार जिनपिंग हे सेरेब्रल एन्जूरिज्म (Cerebral Aneurysm) या गंभीर आजाराशी लढा देत आहेत.
या आजारावर ऑपरेशन करण्याऐवजी पारंपरिक चिनी औषधांद्वारे या आजारावर उपचार करण्यावर जिनपिंग यांनी भर दिला आहे. शी जिनपिंग आजारी असल्याचे वृत्त आत्ता आले असले, तरी ते अस्वस्थ आहेत, अशा प्रकारच्या अटकळी यापूर्वीच बांधण्यात येत होत्या. कोविड–१९चा प्रभाव चीनमध्ये सुरु झाला. त्यानंतर बिजिंगमधील विंटर ऑलिंपिकपर्यंत म्हणजे सुमारे दोन वर्ष त्यांनी जगातील कोणत्याही बड्या नेत्याशी प्रत्यक्ष भेट घेणे टाळले होते. मार्च २०१९ मध्ये जिनपिंग यांच्या इटली दौऱ्यात, त्यांना चालण्या फिरण्यात होणारा त्रास स्पष्टपणे जाणवत होता. याच दौऱ्यात फरान्समध्ये त्यांना बसण्यासही त्रास होत होता. त्यावेळी त्यांना बसण्यासाठी मदत करावी लागली होती.
China’s Xi Jinping suffering from ‘cerebral aneurysm’, was hospitalised: Reports
It is learnt that he preferred to be treated with traditional Chinese medicines rather than going for surgery, which softens the blood vessels and shrinks aneurysm.https://t.co/ylWA9mZ8kb
— Amrita Bhinder ?? (@amritabhinder) May 11, 2022
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना सेलेब्रल एन्जूरिज्म नावाचा मेंदुचा विकार झाला आहे. या आजारामुळे मेंदुतील धमण्या प्रसरण पावतात, त्यामुळे त्या फुटण्याचा धोका असतो. सगळ्या एन्जूरिज्म फुटत नाहीत. एकाच रुग्णांच्या मेंदूत जर अनेक एन्जूरिज्म झाल्या तर धोका वाढण्याची शक्यता असते. यामुळे आजारी व्यक्तीला डोकेदुखी, दिसण्यावर परिणाम अशा समस्यांना तोंड द्यावे लागते.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हेही आजारी असल्याच्या बातम्या मध्यंतरीच्या काळात आल्या होत्या. नुकत्याच आलेल्या एका व्हिडिओने त्यात भर घातली आहे. या व्हिडिओत व्हिक्टरी परेडमध्ये पुतिन खोत असल्याचे आणि पायांवर गोधडी घएऊन बसलेले कार्यक्रमात दिसत आहेत. पुतिन यांना कॅन्सर झाल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. त्यावर ऑपरेशन करणार असल्याचेही सांगण्यात येते आहे.
चीन आणि रशिया या दोन्ही अमेरिकेच्या मुख्य शत्रूराष्ट्रांचे प्रमुख आजारी पडल्याने, अमेरिकेला थोडा दलासा मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही राष्ट्रांविरोधात स्पर्धा आणि शस्त्रसाठा या दोन्हींतही आगामी काळात कपात होईल का, हा खरा प्रश्न आहे.