न्यूर्याक, दि. 10 जानेवारी 2024 | अयोध्येत श्री रामांचे भव्य उभारले गेले आहे. या मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात त्याचा उत्साह सुरु आहे. अमेरिकेतील राम भक्तांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ह्यूस्टनमधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कारमधून निघालेल्या या शोभायात्रेमुळे अमेरिकेतील वातावरण राममय झाले होते. अमेरिकेतील ह्यूस्टनमधील 11 मंदिरांचे दर्शन आणि जय श्रीरामचा जयघोष करत राम नामाचे भजन म्हटले गेले. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विश्व हिंदू परिषद ऑफ अमेरिकेलाही (VHPA) आमंत्रण दिले गेले आहे.
ह्यूस्टनमध्ये निघालेल्या शोभायात्रेत 216 कार होत्या. या शोभायात्रेस आठ बाईकवर पोलीस स्क्वॉड करत होती. श्री मीनाक्षी मंदिरापासून ही शोभायात्रा सुरु झाली. त्यानंतर श्री शरद अंबा मंदिरावर पूर्ण झाली. या शोभायात्रेच्या मार्गावर आलेल्या 11 मंदिरांचे दर्शन करण्यात आले. यावेळी जय श्रीराम आणि रामनामाचे भजन म्हटले गेले. मंदिरांमध्ये आणि रस्त्यात हिंदू समुदायाकडून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. एकूण 160 किलोमीटर ही शोभायात्रा होती.
लिव्हीग प्लानेट फाउंडेशनचे संस्थापक कुसुम व्यास ह्यूस्टन यांनी म्हटले की, ह्यूस्टनमध्ये प्रथमच शोभायात्रा निघाली. अंचलेश अमर, उमंग मेहता आणि अरुण मुंद्रा यासाठी पुढाकार घेतला होता. अंचलेश अमर विश्व हिंदू परिषदेचे सदस्य आहेत. अयोध्यात श्रीराम परत विराजमान होत आहे आणि मंदिर निर्माण झाले आहे, यामुळे अमेरिकेत सर्व जण आनंदीत झाले आहे. अरुण मुंद्रा यांनी सांगितले की, सर्व मंदिरांमध्ये एक बास्केट दिली आहे. त्यात विश्व हिंदू परिषदेला आलेल्या निमंत्रणाचा प्रत, अयोध्यावरुन आलेले तांदूळ, गंगाजल, सुंदरकांडची प्रती आहेत.
रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अमेरिकेत तयारी सुरु आहे. विश्व हिंदू परिषद या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहे. अमेरिकेतील मंदिरांमध्ये प्रसाद वाटप केला जाणार आहे. विश्व हिंदू परिषदेने अमेरिकेत असलेल्या हिंदू बांधवांना घरात पाच दिवे लावण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा
कोणी केले राम मंदिराचे डिझाईन, दोन-चार नाही तर पंधरा पिढ्यांपासून मंदिराच्या आरखड्याचे काम