लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाबाहेरुन पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना अटक केली. Imran Khan यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे वकील फैसल चौधरी यांनी इम्रान खान यांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला. ‘अलकादिर ट्रस्ट केस’ प्रकरणात इम्रान खान यांना अटक झाली आहे. पीटीआय पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या पक्षाचे समर्थक नाराज झालेत. पीटीआयने इम्रान खान यांच्या अटकेनंतर विरोध प्रदर्शनाची घोषणा केली आहे.
इम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद पोलिसांनी स्टेटमेंट जारी केलय. कादिरा ट्रस्ट केस प्रकरणात इम्रान खान यांना अटक झाल्याचं इस्लामाबादच्या आयजींनी सांगितलं. सध्या परिस्थिती सामान्य आहे. कलम 144 लागू करण्यात आलं आहे, असं आयजींनी सांगितलं. कोणी नियमांच उल्लंघन केलं, तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं आयजी म्हणाले.
‘ते खान साहेबांना मारत असतील’
पाकिस्तानातील तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या नेत्या मुसरत चीला म्हणाल्या की, “इम्रान खान यांचा छळ सुरु आहे. ते खान साहेबांना मारत असतील. ते खान साहेबांबरोबर काहीही करु शकतात”
??? High alert by @MusarratCheema !! pic.twitter.com/V4Pt3ypePS
— PTI (@PTIofficial) May 9, 2023
पीटीआयच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन एक टि्वट केलं गेलय. त्यात हायकोर्टाच्या बाहेर इम्रान खान यांना अटक करताना, धक्काबुक्की दरम्यान इम्रान यांचे वकील जखमी झालेत, असं म्हटलय.
They have badly pushed injured Imran Khan. Pakistan’s people, this is the time to save your country. You won’t get any other opportunity. pic.twitter.com/Glo5cmvksd
— PTI (@PTIofficial) May 9, 2023
इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय म्हटलय?
पीटीआयचे उपाध्यक्ष फवाद चौधरी यांनी लोकांना घराबाहेर पडण्याच अपील केलय. इस्लामाबाद हाय कोर्टात हल्ला झालाय. इम्रान खान यांना अटक करण्यात आलीय. त्यांची अटक ही न्यायिक व्यवस्था बंद करण्यासारख आहे. फवाद चौधरी यांनी टि्वटमध्ये म्हटलय की, “हायकोर्टाला रेंजर्सनी घेरलय. वकिलांना त्रास दिला जातोय. इम्रान खान यांच्या कारला चारही बाजुंनी घेरण्यात आलय”
‘इम्रान खान यांच अपहरण केलय’
कोर्टाबाहेरुन इम्रान खान यांच अपहरण करण्यात आलय, असं पीटीआय नेते अजहर मशवानी म्हणाले. तात्काळ प्रभावाने पक्ष संपूर्ण देशात आंदोलन करेल, अशी घोषणा करण्यात आलीय.