इस्रायलचा गाझामधील रुग्णालयावर हल्ला, 50 हजारांहून अधिक ठार

| Updated on: Mar 24, 2025 | 11:49 AM

इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात 50 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. नासिर हॉस्पिटलवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात अनेक जणांचा मृत्यू झाला होता. इस्रायलच्या लष्कराने दक्षिण गाझामधून पॅलेस्टिनींना मोठ्या प्रमाणात विस्थापित करण्याचे आदेश दिले आहेत.

इस्रायलचा गाझामधील रुग्णालयावर हल्ला, 50 हजारांहून अधिक ठार
इस्रायलचा गाझामधील रुग्णालयावर हल्ला
Image Credit source: Instagram
Follow us on

इस्रायलने गाझामध्ये नव्याने हल्ले सुरू केल्यापासून आतापर्यंत 700 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. इस्रायलच्या लष्कराने सोमवारी गाझामधील नासेर हॉस्पिटलवर हल्ला करून हमासचा म्होरक्या इस्माईल बारहौमसह दोन जणांचा बळी घेतला होता. गाझाच्या सरकारी मीडिया कार्यालयाने मृतांचा आकडा 61,700 पेक्षा जास्त असल्याचे सांगितले असून ढिगाऱ्याखाली बेपत्ता हजारो पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इस्रायलच्या सैन्याने गाझामधील अल-मावासी येथील एका तंबूवर बॉम्बहल्ला करून हमासच्या पॉलिटिकल ब्युरोचे आणखी एक सदस्य सलाह अल-बरदाविल यांची हत्या केली होती.

इस्रायलच्या लष्कराने रविवारी सांगितले की, राफाच्या एका भागावर आक्रमण सुरू केल्याने दक्षिण गाझामधून पॅलेस्टिनींना मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्याचे आदेश दिले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

आतापर्यंत 50,021 पॅलेस्टिनी ठार

गाझावरील इस्रायलचे युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 50,021 पॅलेस्टिनी ठार झाले असून 1,13,274 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. गाझाच्या सरकारी मीडिया कार्यालयाने मृतांचा आकडा 61,700 पेक्षा जास्त असल्याचे सांगितले असून ढिगाऱ्याखाली बेपत्ता हजारो पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गाझामधून पॅलेस्टिनींना बाहेर काढण्याचे आदेश

या संघर्षामुळे अनेक महिने विस्थापित झाल्यानंतर अनेक पॅलेस्टिनी आपल्या घरी परतले आणि जानेवारीमध्ये युद्धविरामाला सुरुवात झाली. इस्रायलच्या लष्कराने रविवारी सांगितले की, राफाच्या एका भागावर आक्रमण सुरू केल्याने दक्षिण गाझामधून पॅलेस्टिनींना मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्याचे आदेश दिले जात आहेत.

नेटझरीम कॉरिडॉर पुन्हा ताब्यात

गेल्या आठवड्यात इस्रायली सैन्याने नेतझारिम कॉरिडॉरचा काही भाग पुन्हा ताब्यात घेतल्याची घोषणा केली होती. नेतजारिम कॉरिडॉर गाझाला दक्षिण आणि उत्तरेकडे वेगळे करतो.

जानेवारीत शस्त्रसंधीच्या सुरुवातीला चकमकीतून सैन्य माघारी गेले होते. तेथे उपस्थित असलेल्या हजारो पॅलेस्टिनींना आता मायदेशी परतल्यानंतर काही आठवड्यांतच मोठ्या प्रमाणात स्थलांतराच्या आदेशांना सामोरे जावे लागत आहे.

इस्रायली हल्ल्यांचा निषेध

युनिसेफच्या प्रवक्त्या रोसालिया बोलन म्हणाल्या की, इस्रायलने राफा आणि बेत हनूनसह गाझामध्ये जबरदस्तीने विस्थापन करण्याचे आदेश दिल्याने तेथील कुटुंबांच्या त्रासात भर पडत आहे. इस्रायलमध्ये हजारो इस्रायली नागरिकांनी पश्चिम जेरुसलेममधील पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाकडे मोर्चा काढून गाझा शस्त्रसंधी करारात परत येण्याची मागणी केली.

दक्षिण गाझामधून पॅलेस्टिनींना मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्याचे आदेश दिले जात असले तरी तिथला तणाव पाहता परिस्थिती कधी स्थिर होणार, याबाबत अद्यापही सांगता येत नाही.