बैरुत – स्वताच्याच खात्यातील पैसे काढण्यासाठी, एका व्यक्तीने 10 बँकेच्या कर्मचाऱ्यांना (Bank employee hostage)बंदुकीच्या धाकाने (Gunman) ओलीस ठेवले असल्याची घटना समोर आली आहे. लेबनानच्या राजधानीत बेरुतमध्ये (Beirut)हा सगळा प्रकार घडला आहे. मागण्या मान्य कराव्यात यासाठी या आरोपीने तीनदा हवेत गोळीबारही केलेला आहे. फेडरल बँकेच्या एका शाखेत हा प्रकार घडला असून, या आरोपीचे नाव अलशेख हुसेन अशी झाली आहे. त्याचे वय 42 वर्ष आहे. या अलशेख हुसेन याचे 1कोटी 60 लाख रुपये या बँकेत जमा आहेत. मात्र बँकेने पैसे देण्यास त्याला नकार दिला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या अलशेख याने बँकेतील लोकांना ओलीस ठेवले होते. आपल्या खात्यातील पैसे काढू द्यावेत ही त्याची मुख्य मागणी आहे. ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी तो आग्रही होता. अखेरीस त्याला अटक केल्यानंतर हे ओलीस नाट्य संपलेले आहे.
[NEWS] Gunman holds up Lebanese Federal Bank
An armed man demanding his frozen deposits takes hostages at the Federal Bank of Lebanon branch in the Hamra neighbourhood in west Beirut pic.twitter.com/G3c2H7vJjg हे सुद्धा वाचा— Radio Islam (@radioislam) August 11, 2022
अलशेख याची नोकरी गेलेली आहे. त्याला वडिलांच्या उपचारासाठी आणि घर चालवण्यासाठी पैशांची गरज आहे. बँकेत त्याचे 1.60 कोटी रुपये जमा आहेत. बैरुतमध्ये असलेल्या आर्थिक संकटामुळे, बँकेतून रोख रक्कम काढण्यावर मर्यादा टाकण्यात आलेली आहे. अलशेख याला बँकेतून काही पैसे काढायचे होते. मात्र नियमांचा आधार देत बँकेने त्यांना पैसे काढता येणार नाहीत असे सांगितले आहे. त्यानंतर नाराज झालेल्या अलशेखने पेट्रोलने भरलेली कॅन आणि बंदूक घेऊन बँकेच्या शाखेत प्रवेश केला. हवेत गोळीबार करत त्याने बँकेतील सगळ्यांना बंदी करुन ठेवले. आपले खात्यातील पैसे परत द्या, अशी त्याची मागणी त्याने केली. मात्र नंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
लेबनानी सैन्य, स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी या संपूर्ण परिसराला घेरलेले आहे. या अलशेखशी बोलणी करण्याचा प्रयत्नही पोलीस करत होते. कुठल्याही स्थितीत तोडगा काढण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. पोलिसांनी सर्व बंदी असलेल्या सोडण्याचे आवाहन केले, मात्र अलशेखने आत्तापर्यं केवळ एकालाच सोडलेले आहे. बँकेतून पळालेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे की, हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या वडिलांच्या वैद्यकीय बिलांसाठी या आरोपीला केवळ दीड लाख रुपये हवे आहेत. तेवढीच त्याची मागणी आहे. त्यानंतर काही पैसे दिल्यानंतर त्याने अटक करवून घेतली असल्याची माहिती आहे.
#LEBANON: Hostage situation at commercial bank in Beirut ends after partial payout, with gunman now in police custody.@Reuters story here: https://t.co/5TTbe4JI48
— Maya Gebeily (@GebeilyM) August 11, 2022
आपला बँकेत बंदूक घेऊन असलेला भाऊ अलशेख हा गुन्हेगार नाही, असे त्याच्या भावाने स्पष्ट केले आहे. तो एक सभ्य माणूस असल्याचेही भावाने सांगितले आहे. तो नेहमी दुसऱ्यांना मदत करतो असेही त्याच्या भावाने सांगितले. सध्या तो अडचणीत असल्याने त्याने हे पाऊल उचलले असल्याचे त्याच्या भावाचे म्हणणे आहे.
सध्या लेबनानमध्ये अनेक बँकांच्या बाहेर गर्दी आहे, पैसे निघत नसल्याने नागरिक वैतागलेले आहेत. लोकांनी या बँकेच्या बाहेर गर्दी करत अलशेखच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आहेत आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. सरकार अपयशी झाल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आपले स्वताचे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी हा संघर्ष करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ही स्थिती उद्भवली नसती तर कुणीच कायदा हाती घेतला नसता असे सर्वसामान्यांचे मत आहे.
लेबनान सध्या त्याच्या इतिहासातील स्राविधक आर्थिक संकटाच्या काळातून जात आहे. देशातील तीन चतुर्थांश जनता सध्या गरिबीत आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत लेबनानी पाऊंड 90 टक्क्यांनी घसरलेला आहे. 2019 च्या अखेरच्या काळापासून बँकेतून रोख रक्कम काढण्यावर मर्यादा टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना पैसे मिळवण्यात अडचणी येत आहेत.