श्शूऽऽ.. ‘त्या’ पुलावर जाताच कानात आवाज घुमतो, ‘उड्या मारा’; आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या ब्रिजचं रहस्य काय?

| Updated on: Feb 20, 2021 | 6:06 PM

तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू. पण काही गोष्टी या धडकी भरवणाऱ्या असतात. आता हेच पाहा ना... उड्या मारा... असा शब्द केविन हाईन्सला ऐकायला आला आणि त्याने चक्क पुलावरून उडी मारली. (golden gate bridge of san francisco was number one suicide spot)

श्शूऽऽ.. त्या पुलावर जाताच कानात आवाज घुमतो, उड्या मारा; आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या ब्रिजचं रहस्य काय?
Follow us on

सॅन फ्रान्सिस्को: तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू. पण काही गोष्टी या धडकी भरवणाऱ्या असतात. आता हेच पाहा ना… उड्या मारा… असा शब्द केविन हाईन्सला ऐकायला आला आणि त्याने चक्क पुलावरून उडी मारली. पण 220 फूटाहून उडी मारूनही तो वाचला. पण त्यामुळे चर्चेत आला तो गोल्डन गेट ब्रिज. मनहूस पूल म्हणूनही या पूल चर्चेत आहे. या पुलावरून अनेकांनी आत्महत्या केलीय. किंबहूना या पुलावर आल्यावर लोक आत्महत्या करतात असं म्हणतात. (golden gate bridge of san francisco was number one suicide spot)

केविन हाईन्स हा मानसिक आजारांनी त्रस्त होता. 220 फूटावरून त्याने उडी मारली. उडी मारल्यावर त्याने थोडावेळ विचारही केला. समुद्रात कोसळल्यावर आधी त्याचे पाय समुद्राला धडकणार की डोकं? कारण 120 किलोमीटरच्या वेगाने कोसळल्यानंतर त्याचं डोकं समुद्राला धडकलं तर दगडा सारखंच डोकं त्याचं समुद्राला धडकेल. पण खाली कोसळता कोसळता उडी मारल्याचा त्याला पश्चात्तापही झाला. एवढ्या उंचावरून उडी मारल्यानंतरही तो वाचला. पण त्याला बराच मार लागला. पडताना त्याला शार्क मासा खायला आल्याचं वाटलं. त्याने समोर आलेल्या शार्कला धडकही दिली. पण आश्चर्य म्हणजे शार्कने त्याला बुडू दिलं नाही. जोपर्यंत कोस्ट गार्डची टीम आली नव्हती तोपर्यंत तो समुद्रात तरंगत होता. ही घटना अनेक वर्षांपूर्वीची आहे. ही कहाणी अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोची आहे. आता तोच हाईन्स या गोल्डन गेट ब्रिजवर जाळी लावण्याचं काम करत आहे. कारण पुन्हा कोणी या पुलावरून उडी मारून आत्महत्या करू नये.

सुसाइड नंबर-1 स्पॉट

सॅन फ्रान्सिस्कोचा हा गोल्डन गेट ब्रिज सॅन फ्रान्सिस्कोच्या खाडीला प्रशांत महासागराशी जोडतो. या पुलाची लांबी 1 किलोमीटर 600 मीटर आहे. मात्र, हा पूल म्हणजे इंजीनियरिंगचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. या पुलाशी अनेक रहस्य निगडीत आहेत. गोल्डन गेट ब्रिज वर लोक फिरण्यासाठी येतात. समुद्राच्या ताज्या हवेचा आनंद घेण्यासाठी लोक इथे येतात. पण गेल्या आठ दशकात हा पूल म्हणजे आत्महत्येचा नंबर वन स्पॉट झाला आहे. या पुलावर गेल्यावर उड्या मारा… उड्या मारा… असा कानात आवाज घुमत असल्याचं सांगण्यात येतं.

हा पूल समुद्रापासून 220 फूटावर बनला आहे. त्यामुळे उडी मारताच व्यक्ती चार मिनिटात समुद्राच्या पोटात शिरतो. उडी मारल्यानंतर ताशी 120 किलोमीटरच्या वेगाने व्यक्ती पाण्यात शिरतो. म्हणजे या पुलावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्यांना 1600 वेळा या पुलाने पाहिलं आहे, असा त्याचा अर्थ होतो.

पहिली आत्महत्या

सॅन फ्रान्सिस्कोच्या या पुलावरून एका अज्ञात व्यक्तीने पहिल्यांदा उडी मारली होती. तो पहिल्या महायुद्धातील शूर सैनिक होता. हा गोल्डन गेट ब्रिज 1937मध्ये जनतेसाठी उघडण्यात आला. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये निवृत्त सैनिक हेरॉल्ड वॉबर त्यांच्या एका प्राध्यापक मित्रासोबत पुलावरून फिरायला गेले होते. पुलावर आल्यावर ते अचानक ओरडले. हीच ती जागा आहे. याच जागेवरून उडी मारून मला जग सोडायचं आहे, असं ते जोरात किंचाळले. त्यानंतर वॉबर यांनी त्यांचा कोट काढला. हे पाहून त्यांच्या प्राध्यापक मित्रांनी त्यांची बेल्ट पकडली. पण तरीही त्यांनी जोरात उडी मारून जीवनयात्रा संपवली. त्यानंतर या पुलावरून आत्महत्या करण्याचा सिलसिला सुरू झाला तो आजतागायत सुरूच आहे.

चिमुकलीच्या आत्महत्येने अमेरिका हादरली

गोल्डन गेट ब्रिजवरून 1945मध्ये एका निरागस आणि अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. या मुलीच्या आत्महत्येने संपूर्ण अमेरिकेत हळहळ व्यक्त केली गेली. पाच वर्षाच्या मर्लिन डेमॉन्ट ही तिचे वडील ऑगस्ट यांच्याबरोबर पुलावर गेली होती. पुलाच्या मध्यावर आल्यावर ऑगस्टने या चिमुकलीला पाण्यात उडी मारायला सांगितली. मुलीने उडी मारल्यानंतर त्यानेही पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. नंतर त्यांच्या कारमध्ये सुसाईड नोटही सापडली. त्यामुळे हा पूल मनहूस असल्याची चर्चाही सुरू झाली. (golden gate bridge of san francisco was number one suicide spot)

मनोविज्ञान काय सांगतं?

जेव्हाही आपण ऊंचावर उभे असतो, तेव्हा खाली पाहण्याचा प्रयत्न करतो. संपूर्णपणे सुरक्षित असतानाही आपल्याला पडण्याची भीती वाटते. या भीतीला फ्लोरिडा विद्यापीठीने हायप्लेस फेनोमेना असं म्हटलं जातं. फ्लोरिडा विद्यापीठाच्या टीमने या मनोविज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी एक टीम तयार केली होती. या टीमने 431 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सर्व्हे केला. त्यातील एक तृतीयांश विद्यार्थ्यांनी ऊंचावर गेल्यावर तिथून उडी मारण्याची इच्छा होत असल्याचं सांगितलं. ज्या तरुणांच्या मनात आत्महत्या करण्याची टेंडेन्सी होती, त्यांनी आत्महत्या करण्याचा विचारच केला नव्हता असं स्पष्ट केलं होतं. या पैकी पन्नास टक्के तरुणांनी ऊंचावरून उडी मारण्याची इच्छा झाल्याचं बोलून दाखवलं.

त्यानंतर आणखी एक सर्व्हे करण्यात आला. त्यात एक तरुणी ग्रेट कैन्यान ही रेलिंगवरून खाली वाकल्यानंतर तिलाही आत्महत्या करण्याची इच्छा बळावली. मात्र, मेंदूने तिला तसं न करण्याचे आदेश दिल्याने ती मागे हटली. जर ती पूर्णपणे सुरक्षित होती तर मेंदूने तिला पुन्हा मागे हटण्याच्या सूचना का दिल्या? असा सवाल केला जात आहे. त्यावर मनोरुग्ण तज्ज्ञ हेम्स यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हेम्स यांच्या मतानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीने त्याला ऊंचावरून उडी मारण्याची इच्छा झाल्याचं सांगितलं तर त्याचा अर्थ त्याने मेंदूतून आलेल्या सेफ्टी सिग्नलचा चुकीचा अर्थ काढला असा होतो. त्याच्या मनात उद्भवलेली उडी मारण्याची इच्छा यावरून त्याला जगायचं आहे, हे सिद्ध होतं, असं हेम्स यांनी स्पष्ट केलं. (golden gate bridge of san francisco was number one suicide spot)

 

संबंधित बातम्या:

VIDEO | रोवर लँडिंगवेळी डोक्यात काय चाललेलं? ‘मिशन मार्स’मधील भारतीय वंशाच्या वैज्ञानिक स्वाती मोहन यांच्याशी बातचित

Video : चीनचा कांगावा सुरुच, गलवान खोऱ्यातील व्हिडीओ शेअर करत भारतावर घुसखोरीचा आरोप

Shocking Video! लाईव्ह रिपोर्टिंग करताना चोरट्याने रोखली पत्रकारावर बंदूक, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

(golden gate bridge of san francisco was number one suicide spot)