Isreal-Hamas War | ‘आमचा हात ट्रिगरवरच आहे, जर…’, एका मोठ्या देशाची इस्रायलला धमकी

| Updated on: Oct 16, 2023 | 2:15 PM

Isreal-Hamas War | इस्रायल सध्याच्या घडीला गाझा पट्टीत युद्ध लढत आहे. लेबनॉन सीमेवर हेजबोला आणि सीरिया सीमेवर सुद्धा लढत आहे. आता चौथा फ्रंट उघडला, तर इस्रायलसाठी युद्ध लढण सोपं नसेल.

Isreal-Hamas War | आमचा हात ट्रिगरवरच आहे, जर..., एका मोठ्या देशाची इस्रायलला धमकी
Israel-Hamas Conflict
Image Credit source: AFP
Follow us on

जेरुसलेम : इस्रायलने गाझा पट्टीत हमास विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. इस्रायलकडून सातत्याने हमास विरोधात हवाई हल्ले सुरु आहेत. इस्रायलच्या या एअर स्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांबरोबर अनेक निष्पाप नागरिक मारले जात आहे. इस्रायलने गाझा पट्टीतील उत्तर भाग रिकामी करण्यास सांगितला आहे. लाखो पॅलेस्टिनी नागरिकांचे पलायन सुरु आहे. पुढच्या काही दिवसात गाझा पट्टीत इस्रायलकडून मोठी कारवाई होऊ शकते. इस्रायली सैन्य गाझा पट्टीवर जमा झालं आहे. आक्रमणाचा आदेश मिळताच, कधीही हे सैन्य गाझा पट्टीत घुसून कारवाई सुरु करेल. त्यामुळे आखाती देशांमध्ये तणाव आणखी वाढणार आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये जो हल्ला केला, त्यामागे इराणच पाठबळ सुद्धा आहे. इराणकडून हमासला रसद पुरवण्यात आली. पडद्यामागे इराणचे बरच काही केलं.

आता इराणने इस्रायलला धमकी दिली आहे. पॅलेस्टाइन विरोधातील कारवाई थांबली नाही, तर या भागतील अन्य पक्ष पुढील कृती करण्यासाठी तयार आहेत, असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे. “इस्रायलींनी त्यांची आक्रमकता थांबवली नाही, तर या भागातील अन्य पक्षांचे हातही बंदुकीच्या ट्रीगवर आहेत” असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला संपवण्याचा संकल्प केलाय. हमासच्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी इस्रायली सैन्य सज्ज आहे.

इस्रायलला एकाचवेळी चार फ्रंटवर लढाव लागेल

हमासने इस्रालयवर केलेल्या हल्ल्याशी तेहरानचा संबंध नाही. इराण त्यामध्ये सहभागी नव्हता, असं इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्लाह अली खामेनी यांनी सांगितलं. हा इस्रायलचा लष्करी आणि गुप्तचर यंत्रणेचा पराभव आहे, असं सुद्धा ते म्हणाले. हमासला इराणकडून शस्त्रास्त्र पुरवली जातात, इस्रायल मागच्या अनेक वर्षापासून हा आरोप करतय. आम्ही त्यांना नैतिक आणि आर्थिक मदत देतो, असं तेहरानच म्हणणं आहे.

…..आणि इस्रायलसोबत संबंध बिघडले

1979 साली इराणमध्ये क्रांती झाली. तिथली राजसत्ता उलथवून इस्लामिक विचारधारेला मानणारे शासक सत्तेवर आले, तेव्हापासूनच इराणचे अमेरिका आणि इस्रायलसोबत संबंध बिघडले. इस्रायल सध्याच्या घडीला गाझा पट्टीत युद्ध लढत आहे. लेबनॉन सीमेवर हेजबोला आणि सीरिया सीमेवर सुद्धा लढत आहे. इराण यात सहभागी झाला, तर इस्रायलला एकाचवेळी चार फ्रंटवर लढाव लागेल. इस्रायलने सुद्धा स्वत:ची तशी तयारी करुन ठेवली आहे.