बीजिंग : चीनमध्ये (China) मुसळधार पावसाने कहर माजवला आहे. (Heavy Rain in China) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने भूस्खलन झालं आहे. (Landslide in China). भूस्खलनामुळे काही भागात वीजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला आहे. चायना न्यूज सर्व्हिसने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये आतापर्यंत जवळपास 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
जोरदार पावसामुळे हेनान प्रांतातील (Henan province) मोठं शहर असलेल्या झेंगझाऊ (Zhengzhou) इथं काही ब्रीज आणि बोगदे बंद करावे लागले. गेल्या महिन्यातच पुरामुळे चीनमध्ये 292 लोकांचा मृत्यू झाला होता. चीनमध्ये 95 प्रवासी रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. शान्क्सी (Shaanxi) प्रांतात 24 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांसह परिसराचं जवळपास 500 कोटींचं नुकसान झालं आहे.
जोरदार पावसामुळे दक्षिण पश्चिममधील हेनान, शान्क्सी सिचुआनमधील (Sichuan) जवळपास 25 राज्यमार्ग बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने दुकानं, बाजारपेठा बंद आहेत.
मागील आठवड्यातही तुफान पाऊस
चीनमध्ये गेल्या आठवड्यातही जोरदार पाऊस कोसळला होता. हुबई प्रांतात पावसामुळे 21 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रांतात 503 मिमी पाऊस झाला. ज्यामुळे 3.5 मीटर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं होतं.
China:Hebi Henan, the floods are still not receding pic.twitter.com/ApG2fsYSJm
— handsm (@handsm54350947) August 19, 2021
संबंधित बातम्या
Special Report | चीन मेट्रोची ही स्थिती, मुंबईचं काय होणार?
जगातील सर्वात मोठ्या धरणाला तडा जाण्याची शक्यता, चीनच्या अनेक राज्यांत महापूर