iran president helicopter crash: इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात रविवारी मृत्यू झाला. खराब वातावरणामुळे त्यांचे हेलिकॉप्टर आपत्कालीन परिस्थितीत उतरवण्यात आले होते. हेलिकॉप्टरची ‘हार्ड लँडिंग’ करताना ते क्रॅश झाले. त्यात रायसी आणि इराणचे परराष्ट्रमंत्री होसैन अमीराब्दुल्लाहियन यांचाही मृत्यू झाला. तब्बल 18 तासांनी अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा सापळा सापडला आहे. हे हेलिकॉप्टर अमेरिकेत तयार झालेले होते. अमेरिकतील कंपनीने बनवलेले Bell 212 असे हेलिकॉप्टर होते.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रयसी हे अमेरिकेच्या मेड बेल 212 हेलिकॉप्टरमधून जात होते. हे हेलिकॉप्टर बेल 212 टेक्सट्रॉन इंक या कंपनीने बनवले आहे. बेल टेक्सट्रॉन इंक ही अमेरिकेतील एअरोस्पेसमधील कंपनी आहे. हे हेलिकॉप्टर 15 सीट असणारे होते. बेल 212 हेलिकॉप्टर प्रथम 1960 मध्ये तयार झाले होते. बेल 212 हेलिकॉप्टर शक्तीशाली आणि विश्वासार्ह मानले जाते. परंतु खराब वातावरणाचा फटका हेलिकॉप्टरला बसला आहे.
राष्ट्रपती रयसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात रविवारी झाला होता. त्यानंतर तब्बल 18 तासांपासून त्याचे शोधकार्य सुरु होते. त्यानंतर हे हेलिकॉप्टर मिळाले. अपघातानंतर हेलिकॉप्टर पूर्ण नष्ट झाले होते. या अपघातामध्ये हेलिकॉप्टरमध्ये असलेले कोणीही जिवंत राहिले नाही.
दरम्यान, अपघातानंतरच इराणने 40 वेगवेगळ्या बचाव पथकांना डोंगराळ भागात पाठवण्यात आले. परंतु खराब हवामान आणि सातत्याने कोसळणार पाऊस यामुळे अनेक अडथळे आले. केवळ जमीन मार्गानेच बचाव पथक या भागात पोहोचू शकले आहेत.
इराणच्या राष्ट्रपतीच्या हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी तुर्कीची मदत झाली. यासाठी तुर्कीने त्यांचे अकिंसी ड्रोन (Bayraktar Akinci) चा वापर केला. हा ड्रोन कोणत्याही प्रकारचे SAR ऑपरेशन करण्यास सक्षम आहे. या ड्रोनमध्ये हिट सेन्सरही आहे. कोणत्याही ऋतूत वातावरणात ते काम करु शकते. युद्धामध्ये त्याचा वापर होतो. तुर्कीने हा ड्रोन पाकिस्तानलाही दिला आहे. त्याचे वजन 1350 kg आहे.