Israel vs Hezbollah : हिजबुल्लाहने 24 तासात बदला घेतला, इस्रायलवर मोठा Attack

| Updated on: Jun 12, 2024 | 3:16 PM

Israel vs Hezbollah : इस्रायली सैन्य एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढत आहे. हमास बरोबर युद्ध सुरु आहेच. पण त्याचवेळी मंगळवारी रात्री हिजबुल्लाहने इस्रायलवर मोठा हल्ला केला. खरतर हिजबुल्लाहने बदल्याच्या कारवाईने हा हल्ला केला होता.

Israel vs Hezbollah : हिजबुल्लाहने 24 तासात बदला घेतला, इस्रायलवर मोठा Attack
Israel Iron Dome
Follow us on

इस्रायली सैन्याने मंगळवारी रात्री एअर स्ट्राइक केला. यात हिजबुल्लाहचा सीनियर कमांडर ठार झाला. यानंतर लगेच हिजबुल्लाहने प्रत्युत्तराची कारवाई केली. हिजबुल्लाहने एकाचवेळी इस्रायलवर जवळपास 200 रॉकेट डागले. इस्रायलच्या सैन्य तळांना लक्ष्य केल्याच हिजबुल्लाहने सांगितलं. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ला झाल्यानंतर लेबनान बॉर्डरच्या जवळ असलेल्या इस्रायली शहरात सायनरचा आवाज सुरु झाला.

लेबनॉनमधून इस्रायलच्या दिशेने येणाऱ्या रॉकेट्सना हवेतच आयरन डोम एअर डिफेन्स सिस्टिमने नष्ट केलं. हिजबुल्लाहच्या रॉकेट हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीय. देशात इमर्जन्सी जाहीर करण्यात आलीय. सुरक्षा अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलवली आहे.

10 किलोमीटरच्या कक्षेतील गावांना काय आदेश?

लेबनॉनमधून हिजबुल्लाहने रॉकेट हल्ला केल्यानंतर इस्रायली सैन्याने तात्काळ प्रत्युत्तराची कारवाई सुरु केली. इस्रायली सैन्याने हिजबुल्लाहचे अनेक रॉकेट लॉन्चर उद्धवस्त केलं. इस्र्याली मीडियानुसार, “सैन्याने लेबनॉन बॉर्डरच्या 10 किलोमीटरच्या कक्षेत येणाऱ्या गावातील लोकांना बॉम्ब शेल्टरमध्ये रहाण्यास सांगितलं आहे”

एकाचवेळी इस्रायलवर किती रॉकेट डागले?

लेबनॉनमधून हिजबुल्लाहने आतापर्यंत इस्रायलवर जेवढे हल्ले केले, त्यातील हा सर्वात मोठा हल्ला असल्याच इस्रायली मीडियाने म्हटलं आहे. यावेळी हिजबुल्लाहने एकाचवेळी 200 रॉकेट डागले. इस्रायलची राफेल डिफेन्स सिस्टिम हे रॉकेट हल्ल्याच मुख्य लक्ष्य होतं.


कुठल्या शहरामध्ये एअर स्ट्राइक?

मंगळवारी इस्रायली एअर फोर्सने स्ट्राइक केला. यात हिजबुल्लाहचा सीनियर कमांडर तालेब अब्दुल्ला ठार झाला. त्याच्यासोबत हिजबुल्लाहचे आणखी तीन दहशतवादी मारले गेले. इस्रायलयने हा हल्ला जौइया शहरामध्ये केला. इस्रायली सीमेपासून 25 किलोमीटर अंतरावर लेबनॉनमध्ये जौइया शहर आहे.