डोनल्ड ट्रम्प की कमला हॅरीस? अमेरिकेतील हिंदूंचा आश्चर्यकारक निर्णय, दिले असे कारण…

| Updated on: Sep 07, 2024 | 3:26 PM

donald trump kamala harris: हिंदू फॉर अमेरिका फर्स्टचे अध्यक्ष आणि संस्थापक उत्सव संदुजा यांनी पाठिंब्याचा निर्णय जाहीर करताना सांगितले की, कमला हॅरीस विजयी झाल्या तर भारत अन् अमेरिकेतील संबंधांवर विपरित परिणाम होईल. कमला हॅरीस काही उदारमतवादी लोकांना घेऊन पुढे जातील

डोनल्ड ट्रम्प की कमला हॅरीस? अमेरिकेतील हिंदूंचा आश्चर्यकारक निर्णय, दिले असे कारण...
donald trump kamala harris
Follow us on

अमेरिकेत राष्ट्रध्यक्षपदासाठी नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार आहे. त्यासाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक दोन्ही पक्षांनी आपआपले उमेदवार जाहीर केले आहेत. डेमोक्रेटिक पक्षाकडून भारतीय वंशाचा कमला हॅरीस मैदानात उतरल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्रध्यक्षाच्या स्पर्धेत आले आहेत. या निवडणुकीस दोन महिने बाकी असले तरी प्रचार जोरात सुरु आहे. हिंदू फॉर अमेरिका फर्स्ट ही अमेरिकेतील हिंदूंची संघटना आहे. या संघटनेने कोणाला पाठिंबा द्यावा, हा निर्णय घेतला आहे. संघटनेने भारतीय वंशाचा कलमा हॅरीसला नव्हे तर डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत अन् अमेरिकेतील संबंधांवर विपरित परिणाम

हिंदू फॉर अमेरिका फर्स्टचे अध्यक्ष आणि संस्थापक उत्सव संदुजा यांनी पाठिंब्याचा निर्णय जाहीर करताना सांगितले की, कमला हॅरीस विजयी झाल्या तर भारत अन् अमेरिकेतील संबंधांवर विपरित परिणाम होईल. कमला हॅरीस काही उदारमतवादी लोकांना घेऊन पुढे जातील. ती लोक आशिया आणि अमेरिकेतील मतदारांवर परिणाम करणारे असतील. विद्यामान राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांना रोखण्यासाठी काहीही केले नाही. त्या स्थलांतरित लोकांमुळे अमेरिकेत ड्रग्स तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढली. त्याचा परिणाम अल्पसंख्यक समुदाय आणि आशियाई-अमेरिकी व्यावसायिकांवर झाला आहे.

ट्रम्प कायम भारताचे समर्थक

इमिग्रेशन प्रणाली अधिक गुणवत्तेवर आधारित बनवण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांची सांडुजा यांनी प्रशंसा केली. भारतासोबत संरक्षण आणि तंत्रज्ञान सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून झालेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, ट्रम्प हे भारताचे मोठे समर्थक आहेत. त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांगले नाते आहे. ते आल्यास भारतसोबत अनेक संरक्षण करार करु शकतात. चीनपेक्षा भारताला त्यांचे प्राधान्य राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

हा फरक समजवून सांगितला

संदुजा यांनी सांगितले की, कलमा हॅरिस यांनी भारत सरकार आणि भारतीयांबद्दल अनेक वेळा अवमानकारक टीका केली आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी भारतातील अंतर्गत प्रश्नात कधीच हस्तक्षेप केला नाही. हिंदू फॉर अमेरिका फर्स्ट ही संस्था जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया, मिशिगन, विस्कॉन्सिन, ऍरिझोना आणि नेवाडा यांसारख्या राज्यांतील हिंदूंमध्ये कमला हॅरिसच्या विरोधात मोहीम राबवत असल्याचे संदुजा यांनी सांगितले.