जेवणाचे बिल फक्त ४२ हजार, कारण वेटरला मिळाली तब्बल ८ लाख टीप

| Updated on: Feb 26, 2023 | 3:23 PM

लॉरेन म्हणाली, मी विद्यार्थिनी आहे. एका रेस्टॉरंटमध्ये पार्टटाईम वेटर म्हणून काम करते. ग्राहकाचे जेवण झाल्यावर त्यांना ४२ हजार रुपयांचे बिल दिले.

जेवणाचे बिल फक्त ४२ हजार, कारण वेटरला मिळाली तब्बल ८ लाख टीप
याच हॉटेलमध्ये ८ लाखांची टीप मिळाली
Follow us on

मेलबर्न : तुम्ही अनेकदा हॉटेलात जेवायला जात असणार? त्यावेळी बिल आल्यावर १० ते २० रुपयांची टीप वेटरसाठी ठेवतात. कारण त्याने तुम्हाला चांगली सर्व्हीस दिलेली असते. एखादा श्रीमंत ग्राहक गेला तर १०० किंवा जास्तीत जास्त ५०० रुपये ठेवाल. परंतु एखाद्या व्यक्तीने ८ लाख रुपये टीप दिली असेल? हे सत्य वाटत नाही. त्या व्यक्तीचे बिल फक्त ४२ हजार रुपये होते, परंतु त्याने तब्बल आठ लाख रुपयांची टीप (Getting 8 Lakh Tip) दिली. ही टीप मिळाल्यानंतर त्या वेटरला अश्रू रोखता आले नाही. परंतु त्या वेटरने हे सर्व पैसे स्वत: साठी ठेवले नाही. काही सहकाऱ्यांमध्ये वाटले आणि आता उर्वरित पैशांतून पर्यटन करणार आहे.

ही घटना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील आहे. मेलबर्नमधील एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या लॉरेन हिच्यासोबत ही घडली आहे. लॉरेन शिक्षण घेत असून हॉटेलमध्ये पार्ट टाईम काम करत आहे. नेहमीप्रमाणे ती आपले काम करत होती. त्या दिवशी एका ग्राहकाला तिने ४२ हजार रुपये जेवणाचे बिले दिले. त्याने ८ लाख रुपये टीप जोडण्याचे सांगितले. लॉरेन वाटले आपण काहीतरी चुकीचे ऐकत आहोत. त्या ग्राहकाने परत ८ लाख रुपये टीप जोड, असे सांगितले.

लॉरेन पार्ट टाईम करते

ऑस्ट्रेलियातील 7 न्यूजशी बोलताना लॉरेन म्हणाली, मी विद्यार्थिनी आहे. एका रेस्टॉरंटमध्ये पार्ट टाईम वेटर म्हणून काम करते. ग्राहकाचे जेवण झाल्यावर त्यांना ४२ हजार रुपयांचे बिल दिले. त्यांनी ८ लाख रुपये टीप जोडण्याचे सांगितले. ८ लाख रुपये मिळाल्यानंतर लॉरेन खूप भाविक झाली. तिच्या डोळ्यात आश्रू आले. तिने मॅनेजरला ही टीप घेऊ का विचारले? मॅनेजरनेही तुझी टीप तूच ठेव, असेच सांगितले.

एवढ्या पैशाचं काय केलंस?


८ लाख रुपये मिळाल्यानंतर लॉरेन खूप आनंदी झाली. तिने त्यातील अडीच लाख रुपये आपल्या सहकाऱ्यांमध्ये वाटलेय. उर्वरित ५.५ लाख रुपये घेऊन ती परदेशात पर्यटन करण्याचा विचार करत आहे. लॉरेने त्या टीपचे बिलही आपल्याकडे ठेवले आहे. कारण ते तिच्यासाठी खूप खास आहे. ज्या व्यक्तीने ही टीप दिली ते क्रिप्टो करन्सीचा उद्योजक आहे. त्यांच्याकडे सुमारे १० अब्ज रुपयांची संपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे.