बिजिंग- चीनमध्ये (China)गेल्या 61 वर्षांतील सर्वात मोठा उन्हाळा (summer) आणि दुष्काळ (Drought)पडलेला आहे. त्यामुळे वीज निर्मिती ठप्प झालेली असून वीजेचे संकट उभे राहिलेले आहे. अनेक शहरे ही अंधारात बुडालेली आहेत. वीजेची कमतरता असल्याने चीन सरकारने शॉ़पिंग मॉल्स केवळ पाच तास सुरु ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. शांघाईसारख्या शहरात दोन रात्री वीज नाहीये. फॉक्सवॅगन, एपल आणि टोयटो सारख्या कंपन्यांना त्यांचे प्लांट मधील काम बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे.
The massive heat wave & drought China is experiencing may end up being the worst in recorded history. But turn on the corp news & it’s barely mentioned. George Monbiot calls it The Great Silence. It’s a failure of communication that can’t be rivaled by anything in human history. https://t.co/px9Qe2r74A
हे सुद्धा वाचा— Adam McKay (@GhostPanther) August 24, 2022
चीनमध्ये 18 ऑगस्ट रोजी सिचुआन प्रांतात चोंगक्विंग शहरात तापमान 45 अंशांवर पोहचले होते. चीनमधील वाळवंटी भाग असलेल्या शिनजियांग प्रांताच्याबाहेर आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान आहे. 20 ऑगस्ट रोजी चोंगक्विंग शहराचे किमान तापमान 34.9 अंश सेल्सिअस अतके नोंदवण्यात आले आहे. चीनमधील हे सर्वाधिक किमान तापमान आहे. त्या दिवशी कमाल तापमान हे 43.7 अँश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आलेले आहे. देशातील मध्य आणि दक्षिण-पश्चिम परिसरात सुमारे डझनभर शहरांचे तापमान हे 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आलेले आहे. मंगळवारी चीनमध्ये 165 शहरांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. येत्या काळी काळात या शहरांत किमान आणि कमाल तापमान 40अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. वाढते तापमान पाहता नागरिकांनी घरातच राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
जास्त उष्णता आणि कमी पाऊस यामुळे चीनमधील अडचणी वाढलेल्या आहेत. जुलैत गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. 1961 सालच्या पावसाशी बरोबरी करण्यात आली आहे. दुष्काळामुळे सिचुआन, हुबैई, हुनान, अनहुई आणि चोंगक्विंग प्रातांतील 24.6 लाख नागरिकांना आणि 22 लाख हेक्टर शेतीला फटका बसलेला आहे. यांग्तजी ही चीनची सर्वात लांब आणि जगातील तिसरी सर्वात मोठी नदी आहे. तिब्बेटच्या पठारातून निघून 4 हजार किलोमीटरचा प्रवास करुन ही नदगी चीनमधील सागराला जाऊन मिळते. या नदीमुळे चीनमधील सुपीक जमिनींना पाणी मिळते. यांगत्जी नदीमुळे चीनमधील 40 कोटी लोकांना पिण्याचे पाणी मिळते. यावर्षी मात्र दुष्काळामुळे पाण्याचा फ्लो 5 वर्षांतील सरासरी 50 टक्क्यांनी आटलेला आहे. यामुळे यावर्षी मका आणि तांदळाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होईल, अशी शक्यता वर्तवण्यात य़ेते आहे. अशा स्थितीत चीनला मक्याच्या आयातीसाठी अमेरिका आणि ब्राझीलवर अवलंबून राहावे लागेल.
हीट व्हेह आणि दुष्काळामुळे सिचुआन आणि यांगत्जी नदीला लागून असलेल्या प्रांतातल भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. भाज्यांची वाढ ही 12.9 टक्के झालेली आहे. उष्णतेमुळे अंड्याच्या उत्पादनावरही परिणाम झालेला असल्यामुळे अंड्यांच्या किमतीत 30 टक्के वाढ झालेली आहे.
चीनमधील 15 टक्के वीज ही पाण्यापासून हायड्रोपॉवरने तयार करण्यात येते. कमी पावसामुळे या वीजनिर्मितीवर मोठा परिणाम झालेला आहे. सिचुआन प्रांतात हायड्रोपॉवरसाठी गरजेच्या असलेल्या पाण्यात 50 टक्क्यांनी घट झालेली आहे. तर वाढच्या उष्णतेमुळे विजेची मागणी 25 टक्क्यांनी वाढलेली आहे. एसीची या काळात मागणी वाढल्यामुळे पॉवर ग्रीवर अतिरिक्त भार येतो आहे.
चीनमध्ये भीषण उन्हाळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी यांग्त्जी नदीच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी केमिकल असणारे रॉकेटही सोडण्यात आले. मात्र ढगच नसल्याने हा प्रयत्न अपयशी ठरला.