स्फोट घडवण्याच्या नव्या तंत्रानं साऱ्या जगात खळबळ उडाली आहे. स्फोट झाले आहेत लेबनॉन आणि सिरियात. ते सुद्दा मेसेंजरसाठी
वापरल्या जाणाऱ्या पेजरमध्ये. एक-दोन नव्हे तर तासभर पेजर स्फोटांचा सिलसिला सुरु होता. ज्यात 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि ३ हजारांहून जास्त लोक जखमी झाले आहेत. घरांमधले, दुकानांमधले आणि लोकांच्या खिशात असलेले पेजर अचानक फुटले. माहितीनुसार हे सारे स्फोट इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादनं हिजबुल्लाहला टार्गेट करण्यासाठी करण्यात केले. हिजबुल्लाह ही इराण समर्थक
लेबनॉनमधील दहशतवादी संघटना आहे. पण हातामधले पेजर अचानक बॉम्बस्फोटात कसे काय बदलले., त्यासाठी नेमकं काय तंत्रज्ञान वापरलं गेलं. यावरुन जगभरात हल्लकल्लोळ सुरु आहे.
पेजर हे मोबाईल येण्याआधी संपर्कासाठी वापरलं जाणारं एक इलेक्ट्रॉनिक यंत्र होतं. पेजरद्वारे प्रत्यक्ष संवादाऐवजी फक्त मेसेजची देवाण-घेवाण केली जाते. जगभरात पेजरचा उपयोग होत नसला तरी माहितीनुसार लोकेशन ट्रॅक होऊ नये म्हणून इस्रायलपासून बचावासाठी हिजबुल्लाहसारख्या संघटना आजही पेजरचा उपयोग करतात.
मात्र मुद्दा हा आहे की.,एकाचवेळी इतक्या साऱ्या पेजरमध्ये जर मोसादनं स्फोट घडवून आणला असेल. तर ते शक्य कसं झालं. सीएनएनच्या दाव्यानुसार पेजर हॅक करुन त्यांच्यातल्या लिथीयम बॅटरिला गरम करण्यात आलं आणि एक प्रोगाम बनवून विशिष्ट प्रकारचा मेसेज पेजरवर पाठवला गेला. त्याचवेळी पेजर स्फोटासारखे फुटले. एक दावा असाही आहे की पेजरचं उत्पादन करतानाच त्यांच्यात काही ग्रॅम स्फोटक लावली गेली होती. ज्यांना एका रिमोटद्वारे ऑपरेट करुन स्फोट घडवला गेला. इस्रायलच्या मोसाद संघटनेनं तब्बल ५ हजार पेजरवर ३ ग्रॅमपर्यंतचे स्फोटकं लावल्याचाही आरोप होतोय.
ताईवानच्या एका कंपनीकडून हिजबुल्लाहनं ५ हजार पेजर खरेदी केले होते. जुन्या तंत्रज्ञानाचे पेजर ट्रॅक होत नसल्यामुळे इस्रायली संघटनांना लोकेशन न सापडू देण्याचा यामागचा हेतू होता. मात्र तेच पेजर्स स्फोटात रुपांतरित झाल्यानं यामागे इस्रायलच्या मोसादचा हात असल्याचं सांगितलं जातं आहे.