अंतराळात पाणी पिणे किती कठीण? सुनीता विल्यम्सने थेट अंतराळातून पाठवला व्हिडिओ

| Updated on: Dec 07, 2024 | 8:12 PM

एका विद्यार्थ्याने सुनीता विल्यम्स यांना पाणी कसे प्यावे असे विचारले तेव्हा सुनीताने पाण्याचे पॅकेट बाहेर काढले आणि मग त्यातून काही पाण्याचे बुडबुडे बाहेर आले. त्यानंतर तिने ते पिऊन दाखवले. सुनीता विल्यम्स गेल्या सहा महिन्यांपासून अंतराळात अडकली आहे. आता फेब्रुवारीमध्ये ती परत येणार आहे.

अंतराळात पाणी पिणे किती कठीण? सुनीता विल्यम्सने थेट अंतराळातून पाठवला व्हिडिओ
Follow us on

भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली आहे. जून महिन्यापासून ती इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर आहे. अंतराळाशी संबंधित विविध प्रयोग करण्यासाठी ती अंतराळात गेली होती. पण यानात काही बिघाड झाल्याने ती तिथेच अडकली. सुनीताने अलीकडेच काही विद्यार्थ्यांशी ती अंतराळात पाणी कसे पितात हे सांगितले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकं त्यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत. सुनीता विल्यम्सने तिचे मूळ गाव नीडहॅम, मॅसॅच्युसेट्स येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ते करुन दाखवलं आहे.

एका विद्यार्थ्याने सुनीता यांना त्या अंतराळात पाणी कसे पितात याबाबत विचारले होते. त्यानंतर सुनीताने पाण्याचे पाकीट काढले. त्यातून पाण्याचे काही बुडबुडे बाहेर आले. अवकाशयानात ते बुडबुड उडत असताना सुनीताने हे प्यायले. सुनीता हिने तिचा साथीजार विल्मोर बुच सोबत अंतराळात सहा महिने पूर्ण केले आहेत. हे दोघेही जूनच्या पहिल्या आठवड्यात स्टारलाइनर यानाद्वारे अंतराळात गेले होते. पण तांत्रिक अडचणींमुळे दोघांनाही आता पुढच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत तिथेच राहावे लागणार आहे.

सुनीता अंतराळात स्पेस स्टेशनमध्ये विविध प्रकारची कामे करत आहे. अलीकडेच सुनीताने अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात लेट्यूस पिकवले आहे. याद्वारे मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये वेगवेगळ्या पाण्यात भाज्या कशा वाढतात हे जाणून घेण्याचा तिने प्रयत्न केला.

सुनीताच्या एका फोटोवरुन जगभरात खळबळ उडाली होती. या फोटोवरुन प्रकृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. एका फोटोत सुनीता खूपच अशक्त दिसत होती. नासापासून जगभरातील शास्त्रज्ञांना हे पाहून आश्चर्य वाटले. मात्र, सुनीताने नंतर स्पष्ट केले की, अंतराळात जाताना तिचे वजन जेवढे होते तेवढेच आहे आणि ती पूर्णपणे निरोगी आहे.