Israel vs Hezbollah : हिज्बुल्लाह दहशतवाद्यांच्या पेजर ब्लास्टशी भारतात जन्मलेल्या बिझनेसमॅनच काय कनेक्शन?

| Updated on: Sep 21, 2024 | 11:00 AM

Israel vs Hezbollah : लेबनान मंगळवारी एकापाठोपाठ एक झालेल्या पेजर ब्लास्टने हादरलं. हिज्बुल्लाह दहशतवाद्यांच्या पेजरमध्ये हे ब्लास्ट झाले. एकाचवेळी हजारो पेजरमध्ये ब्लास्ट कसा होऊ शकतो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने घडवून आणलेल्या या स्फोटात आता भारतात जन्मलेल्या एका बिझनेसमनचा नाव आलं आहे.

Israel vs Hezbollah : हिज्बुल्लाह दहशतवाद्यांच्या पेजर ब्लास्टशी भारतात जन्मलेल्या बिझनेसमॅनच काय कनेक्शन?
Hezbollah Pager Blast
Follow us on

लेबनानमध्ये मंगळवारी हजारो पेजर्समध्ये ब्लास्ट झाला. यात 20 जण ठार झाले. हिज्बुल्लाहचे हजारो दहशतवादी जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने हे कसं घडवून आणलं? एकाचवेळी हजारो पेजर्समध्ये कसा काय ब्लास्ट होऊ शकतो? अशी चर्चा सुरु झाली. इस्रायलने हे कसं घडवून आणलं? त्यामागे काय रणनिती होती? हे आता समोर येऊ लागलं आहे. इस्रायलने यासाठी काही शेल कंपन्या बनवल्या होत्या. या कंपन्या पेजर्स बनवून विकण्याच काम करतात असं दाखवलं होतं. आता या प्रकरणात भारतात केरळमध्ये जन्मलेल्या एका व्यक्तीच नाव आलं आहे. तो आता नॉर्वेचा नागरिक आहे.

नॉर्टा ग्लोबल लिमिटेड ही बलगेरीयन कंपनी या पेजर डीलमागे असल्याचा दावा टेलेक्स या हंगेरीयन मीडियाने केला आहे. नॉर्टा ग्लोबलची स्थापना रेनसन जोसने केली आहे. रेनसन जोस आता नॉर्वेचा नागरिक आहे. रेनसन जोसचा जन्म केरळच्या वायनाड येथे झाल्याच वृत्त केरळमधील प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. MBA पूर्ण केल्यानंतर रेनसन नॉर्वेला स्थायिक झाला. काही स्थानिक टीव्ही चॅनल्स रेनसनच्या नातेवाईकांसोबत बोलले.

टेलर जोस कोण?

रेनसनचे वडील टेलर आहेत. वायनडा मनंतावडी येथे टेलरिंगच्या दुकानात ते काम करतात. आहे. टेलर जोस म्हणून परिसरात त्यांना लोक ओळखतात. बलगेरियन सुरक्षा यंत्रणा SANS ने सांगितलं की, अशी कुठलीही शिपमेंट त्यांच्या देशातून गेलेली नाही. त्यामुळे रेनसन जोस आणि नॉर्टा ग्लोबल क्लीनचीट मिळालीय.

रेनसनला एका जुळा भाऊ

स्थानिक मीडियानुसार रेनसनला एका जुळा भाऊ आहे. त्याचं नाव जिनसन आहे. तो यूकेमध्ये आणि बहिण आयर्लंडला स्थायिक आहे. रेनसन मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात आला होता. जानेवारीमध्ये तो नॉर्वेला निघून गेला.

कुटुंबियांनी काय सांगितलं?

रेनसनचे काका थंकाचन मनोरमा ऑनलाइनशी बोलताना म्हणाले की, “रेनसनने मनंतावडी माथा कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर MBA च शिक्षण घेऊन केयरटेकर म्हणून नॉर्वेला निघून गेला. तिथे गेल्यानंतर त्याच्या नोकरी, व्यवसायाबद्दल आम्हाला माहित नाही” लेबनानमध्ये झालेल्या पेजर ब्लास्टशी केरळमधल्या एका व्यक्तीच कनेक्शन समोर आलय. इस्रायलने फक्त हिज्बुल्लाहचाच विचार केला नाही, तर तपासकर्त्यांना गोंधळात टाकण्यासाठी शेल कंपन्या उभ्या केल्या होत्या.