जेरुसलेम : सध्या सगळ्या जगाच लक्ष गाझापट्टीकडे लागलं आहे. इस्रायल आणि हमासच्या दहशवाद्यांमध्ये युद्ध सुरु आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीत सतत बॉम्बफेक सुरु आहे. यात हमासच्या दहशतवाद्यांबरोबर अनेक निरपराध मारले जात आहेत. आज जगातील बहुतांश देशात इस्रायल समर्थक आणि पॅलेस्टिनी समर्थक असे दोन गट दिसत आहेत. भारतातही इस्रायल समर्थकांची संख्या कमी नाहीय. इस्रायलला भारत खूप जवळचा मित्र वाटतो. इस्रायलमध्येही भारतीय वंशाचे ज्यू लोक मोठ्या संख्येने राहतात. ज्यू म्हणजे यहुदी ते भारतात कसे आले? त्यांना भारताबद्दल इतका विश्वास कसा वाटतो? ज्यूंच महाराष्ट्रातल्या अलिबागशी काय कनेक्शन आहे? जाणून घ्या याबद्दल सर्वकाही.
जुन्या काळपासून ज्यूंसाठी भारत एक सुरक्षित आश्रय स्थळ राहिलं आहे. कारण इथे त्यांना कधीही धार्मिक त्रास देण्यात आला नाही, जो त्यांना जगाच्या अन्य भागात सहन करावा लागला. भारतात स्थायिक झालेल्या इस्रायलींबद्दल असं म्हटलं जात की, ते बेने इस्रायली, कोचीनी आणि बगदादी आहेत. भारतात नॉर्थ-इस्टमध्ये राहणाऱ्या Bnei Menashe ज्यूंबद्दल कोणतीही माहिती नव्हती. इस्रायलच्या मेनाशे समुदायातील ज्यू, एका जहाज दुर्घटनेमुळे भारतात आले. यातील बहुतांश ज्यू कोकण आणि मुंबईत स्थायिक झाले. बेने इस्रायली 2400 वर्षांपूर्वी अलिबागला आले. त्यावेळी त्यांची लोकसंख्या 75 हजारच्या घरात होती. आता फक्त 4 हजार बेने इस्रायली उरले आहेत.
इस्रायलमध्ये भारतीय वंशाचे किती हजार ज्यू राहतात?
नोहा मस्सील यांचं इस्रायलमध्ये ‘मायबोली’ नावाच त्रैमासिक प्रसिद्ध होतं. विशेष म्हणजे इस्रायलमध्ये प्रसिद्ध होणार हे मराठी त्रैमासिक आहे. तीन महिन्य़ातून एकदा हे त्रैमासिक प्रकाशित होतं. नोहा मस्सील हे इस्रायलमधील भारतीय ज्यू संघटनेने अध्यक्ष आहेत. इस्रायलमध्ये भारतीय वंशाचे 85 हजार ज्यू राहतात. त्यांच्याकडे इस्रायली पासपोर्ट आहे. 1950 ते 1960 दरम्यान भारतातून मोठ्या प्रमाणात ज्यू इस्रायलमध्ये स्थायिक झाले. महाराष्ट्रातून इस्रायलमध्ये जाणाऱ्या ज्यूंची संख्या सर्वात जास्त होती. त्यांना बेने इस्रायली म्हटल जातं.