Israel-Hamas War | इस्रायलला युद्ध खूपच महाग पडणार, इतक्या हजार कोटींचा येणार खर्च

| Updated on: Oct 13, 2023 | 1:51 PM

Israel-Hamas War | Israel Palestine Conflict बद्दल एक लेख छापण्यात आलय. ज्यात हापोलिमच्या हवाल्याने युद्धातील खर्चाबद्दल अंदाज वर्तवण्यात आलाय. अंदाजानुसार हा खर्च खूप मोठा आहे. ज्यात इस्रायलच सुद्धा नुकसान आहे.

Israel-Hamas War | इस्रायलला युद्ध खूपच महाग पडणार, इतक्या हजार कोटींचा येणार खर्च
Israel-Hamas War
Image Credit source: AFP
Follow us on

जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमधील युद्धा वाढत चालल आहे. या युद्धात इस्रायलच जिवीतहानी बरोबर सार्वजनिक संपत्तीच नुकसान झालय. त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त नुकसान हमासच गाझा पट्टीत झालय. गाझा पट्टीत खूप वाईट स्थिती आहे. इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1354 आहे. इस्रायलची बाजू या युद्धात वरचढ आहे. पण त्यांच्या खिशाला मोठा फटका बसतोय. Israel-Hamas War युद्धाच्या खर्चावरुन इस्रायलमधील मोठी बँक हापोलिमने आपला अंदाज जाहीर केलाय. दोन्ही देशांमध्ये कुठलही युद्ध अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक असतं. इस्रायल आणि हमासच्या युद्धावरुन आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषने इशारा दिलाय.

इस्रायल आणि हमासमधील युद्ध फक्त दोन देशांच्या इकोनॉमीला प्रभावित करणार नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. इस्रायलमधील एका वर्तमानपत्रात Israel Palestine Conflict बद्दल एक आर्टिकल छापण्यात आलय. ज्यात हापोलिमच्या हवाल्याने युद्धातील खर्चाबद्दल अंदाज वर्तवण्यात आलाय. Bank Hapoalim नुसार, हमासला मूळापासून संपवण्यासाठी इस्रायलला जवळपास 27 अब्ज इस्रायली शेकेल इतका मोठा खर्च येईल.

भारतीय रुपयांमध्ये हा आकडा किती?

बँक होपोलिमने वर्तवलेला अंदाज अमेरिकी डॉलरमध्ये पाहिला, तर 6.8 अब्ज डॉलरचा खर्च येऊ शकतो. भारतीय रुपयांमध्ये हा आकडा कन्वर्ट केला, तर इस्रायलचा होणारा एकूण खर्च जवळपास 56,804 कोटी रुपये असेल. युद्ध आणखी किती लांब खेचलं जाणार, याबद्दल आताच कुठला अंदाज वर्तवण घाईच ठरेल. गाझा पट्टीत इस्रायलच्या बॉम्ब वर्षावामुळे मोठ नुकसान झालय. 3 लाख सैन्य इस्रायलने जमवलय. हे सैन्य कुठल्याही क्षणी गाझा पट्टीत घुसू शकतं. सध्या गाझापट्टीत इस्रायलकडून सतत बॉम्बफेक सुरु आहे.