वॉशिंग्टन | 8 सप्टेंबर 2023 : जगात अनेक ठिकाणी गुडविल स्टोअर्स आहेत. त्यात गरीबांसाठी कोणी ना कोणी काही टाकत असतो. गरीबांना मदत व्हावी यासाठी हे गुडविल स्टोअर्स उघडण्यात आले आहेत. लोकही या दानपेटीत काहींना काही टाकून आपलं योगदान देत असतात. काही लोक त्यात पैसे टाकतात. काही लोक वस्तू तर काही लोक कपडे दान करतात. नंतर याच वस्तू स्वस्तात किंवा फुकटात गरिबांना दिल्या जातात. त्यांच्या गरजा भागवण्यासाठी हे काम काही लोक करत असतात. पण या दानपेटीत जर एखादी अशी वस्तू निघाली आणि त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आलं तर… अमेरिकेतील एका गुडविल स्टोअरच्या दानपेटीत अशीच एक गोष्ट टाकण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.
या दानपेट्यांमध्ये टाकलेल्या वस्तू आणि पैशांचा दर आठवड्याला किंवा दोन दिवसाने हिशोब केला जात असतो. नंतर त्या वस्तू गरजूंना वाटप केल्या जातात. एक सत्कर्म म्हणून हे काम केलं जातं. एका संचालकानेही या गुडविल स्टोअरमधील दानपेटी उघडली. दानपेटी उघडल्यानंतर त्यात जे काही दिसलं त्यामुळे या संचालकाच्या तोंडचं पाणीच पळालं. या संचालकाची घाबरगुंडी उडाली. त्याने तात्काळ पोलिसांना फोन केला. या दानपेटीत पैसे नव्हते, कपडे नव्हते, खाण्यापिण्याची वस्तू नव्हती ना खेळणी. या दानपेटीत होती एक मानवी कवटी. त्यामुळेच या संचालकाचे धाबे दणाणले.
5 सप्टेंबर रोजी स्टोअरच्या दानपेटीत मानवी कवटी सापडली. पोलिसांनी ही कवटी ताब्यात घेतली. कुणाची हत्या झाली का याची माहिती घेण्यासाठी ही कवटी ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र, ही खोपडी कुणाची आहे हे ओळखणं कठिण आहे. करड्या रंगाची ही कवटी होती. या कवटीचे वरचे दात दिसत होते. या कवटीचा उजवा डोळा नकली होता. ही कवटी अत्यंत भयानक दिसत होती.
मेडिकल कार्यालयाने याबाबतची एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही मानवी कवटी ऐतिहासिक आहे. खूप जुनी आहे. या कवटीची फॉरेन्सिक चौकशी होईल असं काहीच त्यात उरलेलं नाही. मात्र, तरीही याबाबतचे अनेक सवाल निर्माण झाले आहेत. ते म्हणजे, ही कुणाची कवटी आहे? तो माणूक कोण होता? ही कवटी कुणी आणून ठेवली? दानपेटीच्या आसपास कॅमेरे आहेत काय? या सर्वांची चौकशी करण्याची गरज आहे, असं मेडिकल कार्यालयाने म्हटलं आहे.