मी मलाला नाही… काश्मीरमध्ये राहणाऱ्या तरुणीने पाकिस्तानला दिलं सडतोड उत्तर

| Updated on: Feb 23, 2024 | 5:31 PM

ब्रिटनच्या संसदेत बोलताना काश्मिरीच्या तरुणीने पाकिस्तानला आरसा दाखवण्याचं काम केलं आहे. पाकिस्तानालाच नाही तर तिने आंतरराष्टीय पत्रकारांना देखील भारताबाबत खोटे दावे करण्यापासून रोखले आहे. आम्ही काश्मीरमध्ये सुरक्षित असून बाहेरच्या लोकांनी तिथे बसून काश्मीरबाबत बोलू नये असे देखील तिने म्हटले आहे.

मी मलाला नाही... काश्मीरमध्ये राहणाऱ्या तरुणीने पाकिस्तानला दिलं सडतोड उत्तर
Follow us on

Kashmiri girl on Pakistan : लंडनमध्ये ब्रिटीश संसदेने आयोजित केलेल्या ‘संकल्प दिवस’मध्ये बोलताना काश्मीरच्या या कन्येने पाकिस्तानला जोरदार उत्तर दिले आहे. पाकिस्तानकडून भारताच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं देखील तिने म्हटले आहे. याना मीर म्हणाली की, जम्मू-काश्मीरमध्ये ती सुरक्षित आणि मनमोकळे पणाने राहत आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील. मीर हिने आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना आरसा ही दाखवला. जम्मू-काश्मीरमधील लोकांमध्ये फूट पाडू नये असे देखील तिने म्हटले आहे.

मी मलाला युसुफझाई नाही…

ब्रिटीश संसदेत बोलताना मीर म्हणाली की, मी मलाला युसूफझाई नाही. यावेळी तिने पाकिस्तानला आरसा दाखवला. भारतातील काश्मीरमध्ये ती सुरक्षितपणे राहत आहे, जिथे दहशतवादाच्या धमक्यांमुळे तिला आपला देश सोडावा लागणार नाही. तिने दहशतवादाचा सामना करताना देशाच्या एकतेवर विश्वास व्यक्त केला.

भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न

मीर ब्रिटनच्या संसदेत म्हणाली की, ‘मी मलाला युसूफझाई कधीच होणार नाही, पण मलालाने माझ्या देशाची, माझ्या पुरोगामी मातृभूमीला शोषित म्हणवून बदनाम केल्याबद्दल मला आक्षेप आहे. मी सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय मीडियाच्या अशा सर्व टूलकिट सदस्यांना सांगू इच्छिते की, अशा लोकांनी कधीही भारतीय काश्मीरला जाण्याची तसदी घेतली नाही परंतु तेथून दडपशाहीच्या कथा रचल्या.

मीर पुढे म्हणाले की, मी तुम्हाला विनंती करते की, धर्माच्या आधारे भारतीयांचे ध्रुवीकरण थांबवा, आम्ही तुम्हाला तोडू देणार नाही. दहशतवादामुळे हजारो काश्मिरी मातांनी आपले पुत्र गमावले आहेत, त्यामुळे आता माझ्या काश्मिरी समाजाला शांततेत जगू द्या.

कलम 370 रद्द केल्याचे फायदे

कार्यक्रमात एका काश्मिरी पत्रकाराने कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये झालेल्या प्रगतीबद्दल विचारले तेव्हा मीर म्हणाले की, आता तेथील सुरक्षा वाढली आहे. भारतीय लष्कराच्या प्रयत्नांचेही तिने कौतुक केले.

भारताने २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा मोदी सरकारने काढून घेतला होता. त्यांना देखील त्यानंतर इतर राज्यांप्रमाणेच भारतीय राज्यघटनेतील सर्व तरतुदी लागू झाल्या आहेत. जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्याचे विभाजन करणारा कायदा मंजूर केला. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा असणार आहे. पण लडाखमध्ये नसेल.