Ibrahim raisi death : राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला अप्रत्यक्षपणे अमेरिकाही जबाबदार

| Updated on: May 21, 2024 | 9:06 AM

Ibrahim raisi death : सध्या संपूर्ण इराण शोकसागरात बुडाला आहे. त्यांचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या अपघातावरुन अनेक जण वेगवेगळे थिअरी मांडत आहेत. यामागे घातपात असल्याची शक्यता सुद्धा काहींनी व्यक्त केलीय. नेमकी ही घटना कशी घडली? ते समोर येईलच. पण रईसी यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला अप्रत्यक्षपणे अमेरिका सुद्धा तितकीच जबाबदार आहे.

Ibrahim raisi death : राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला अप्रत्यक्षपणे अमेरिकाही जबाबदार
इब्राहिम रायसी : 19 मे 2024 रोजी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्र मंत्री अमीर अब्दुल्लाहियान यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. हे दोन्ही नेते एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांतातून ते परत येत असताना हा अपघात झाला.
Follow us on

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत काल मृत्यू झाला. रविवारी अझरबैजानहून परतताना त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. रविवार संध्याकाळपासूनच त्यांच्या हेलिकॉप्टरशी संपर्क होत नव्हता. अखेर काल हेलिकॉप्टरचा ढिगारा सापडला. खराब हवामामुळे हा अपघात झाला. काहीजण यामागे घातपाताची शक्यता व्यक्त करत आहेत. इस्रायल, अमेरिकवर संशय व्यक्त केला जात आहे. हा अपघात होता की, घातपात हे चौकशीनंतर स्पष्ट होईलच. पण इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेला अप्रत्यक्षपणे अमेरिका सुद्धा जबाबदार आहे. इराणकडे खूप जुनी हेलिकॉप्टर, विमानं आहेत. 60-70 च्या दशकातील हेलिकॉप्टर आणि फायटर विमानांचा इराणकडून अजूनही वापर सुरु आहे. यातली अनेक हेलिकॉप्टर, फायटर विमानं कालबाह्य झाली आहेत. त्यांचं उत्पादनही बंद आहे. इराण अजूनही कालबाह्य झालेली हेलिकॉप्टर, विमान का वापरतो? असा प्रश्न पडू शकतो, त्याला कारण आहे, अमेरिकेने घातलेले निर्बंध.

इराणमध्ये 1979 साली इस्लामिक क्रांती झाली. त्यानंतर अमेरिकेने इराणवर निर्बंध घातले. त्यामुळे त्यांना अमेरिकी आणि युरोपियन पुरवठादारांकडून नवीन विमान आणि त्यांचे सुट्टे भाग विकत घेता येत नाहीत. बोईंग आणि एअर बस या कंपन्यांकडून नागरी विमान सुद्धा खरेदी करता येत नाहीत. परिणामी आजही इराण जुन्या, कालबाह्य झालेल्या विमान, हेलिकॉप्टरवर अवलंबून आहे. इराणी एअर लाइन्स आजही जगातील सर्वात जुन्या विमानांचा वापर करत आहे. MD-83, एअरबस A300 आणि A310 ही विमान जगातील बहुतांश देशांमध्ये निवृत्त झाली आहे, त्यांचा वापर बंद करण्यात आला आहे. पण इराणमध्ये आजही या विमानांचा वापर सुरु आहे.

इब्राहिम रईसी कुठल्या हेलिकॉप्टरमध्ये होते?

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, अपघाताच्यावेळी इब्राहिम रईसी Bell 212 हेलिकॉप्टरमध्ये होते. अमेरिकन बनावटीच हे हेलिकॉप्टर सर्वप्रथम 1968 साली वापरात आलं. 1998 साली त्याचं उत्पादन थांबवण्यात आलं. 2018 साली आखाती देशामध्ये हे Bell 212 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. 2015 साली इराणचा अमेरिकेबरोबर अण्वस्त्र करार झाला. त्यानंतर निर्बंध थोडे शिथिल झाले, त्यावेळी जर्मनी इराणला त्यांचा हेलिकॉप्टर ताफा अपग्रेड करण्यासाठी मदत करणार होता. पण त्यानंतर सत्तेवर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने पुन्हा निर्बंध लादले. परिणामी इराणच्या ताफ्यात आजही जुनी हेलिकॉप्टर्स, विमान आहेत.