मोदीही पाकिस्तानात आले असते तर…; पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ काय म्हणाले

| Updated on: Oct 14, 2024 | 10:36 PM

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पुन्हा एकदा भारताबाबत वक्तव्य केले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीही SCO शिखर परिषदेत सहभागी झाले असते तर खूप चांगले झाले असते, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. मला आशा आहे की नजीकच्या काळात ते येतील.

मोदीही पाकिस्तानात आले असते तर...; पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ काय म्हणाले
Follow us on

पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेपूर्वी नवाझ शरीफ यांचं भारताबाबतचं वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी पुन्हा एकदा भारतासोबत चांगल्या संबंधांचा पुरस्कार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील एससीओ परिषदेत सहभागी झाले असते आणि पाकिस्तानात आले असते तर खूप चांगले झाले असते, असे नवाज शरीफ यांनी म्हटले आहे. 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये SCO शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी चार सदस्यीय भारतीय शिष्टमंडळ पाकिस्तानात पोहोचले आहे.

काय म्हणाले नवाज शरीफ

एका मुलाखतीत नवाझ शरीफ म्हणाले की, “मी नेहमीच भारतासोबत चांगले संबंध असावे याचा समर्थक आहे. मला आशा आहे की आमच्या संबंधांना पुनरुज्जीवित करण्याची संधी मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर SCO शिखर परिषदेला आले असते तर खूप चांगले झाले असते. मला आशा आहे की नजीकच्या काळात त्यांच्यासोबत आम्हाला एकत्र बसण्याची संधी मिळेल.

भारताच्या चांद्रयान-३ चे कौतुक

नवाझ शरीफ यांनी भारताचे कौतूक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी अनेक वेळा भारतासोबतचे संबंध सुधारण्याबाबत वक्तव्य केले आहे. प्रदीर्घ काळानंतर लंडनहून पाकिस्तानात परतल्यानंतर नवाझ शरीफ यांनी एका कार्यक्रमादरम्यान आपला देश जगाकडून पैसे मागत असल्याचे म्हटले होते, तर दुसरीकडे भारत चंद्रावर पोहोचला आहे. असे वक्तव्य त्यांनी केले होते. “आज भारताच्या तिजोरीत 600 अब्ज डॉलर्स आहेत. भारत G20 चे आयोजन करत आहे, पण पाकिस्तान चीन आणि अरब देशांसह जगाकडून प्रत्येकी 1 अब्ज डॉलर्सची मागणी करत आहे.

कारगिल युद्धाचा गुन्हा कबूल

मे 2024 मध्ये नवाझ शरीफ यांनी ‘भारताला दिलेले वचन मोडल्याची चूक’ मान्य केली. पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) च्या बैठकीत नवाझ शरीफ म्हणाले होते, “स्फोट घडवून आणणे हा मोठा निर्णय होता.” पाकिस्तानने आज पाच बॉम्बस्फोट करून प्रत्युत्तर दिल्याचे वृत्त भारतीय संसदेत प्रसिद्ध झाले हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर वाजपेयी साहेब लाहोरला आले. तुम्हाला आठवतंय की नाही?” शरीफ म्हणाले, “वाजपेयी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं, त्यात आमचाच दोष आहे.