देशातील सर्वात मोठी मीडिया कंपनी टीवी9 नेटवर्कच्या न्यूज9 ग्लोबल समिटला सुरुवात झाली आहे. जर्मनीच्या स्टटगार्ट शहरातील ऐतिहासिक फुटबॉल मैदान MHP एरिनामध्ये ही समीट होत आहे. या समिटला उपस्थित राहण्यासाठी भारतासह जगातील नामवंत व्यक्ती तिथे पोहोचल्या आहेत. या प्रसंगी वीएफबी स्टटगार्टचे चीफ मार्केटिंग अँड सेल्स ऑफिसर रूवेन कॅस्पर यांनी India-Germany: Business & Beyond वर आपले विचार व्यक्त केले. ते यावेळी इंडो-जर्मन रिलशनशिपबद्दल बोलले. ते या प्रसंगी काय बोलले, ते जाणून घ्या.
“सध्याच जियो पॉलिटिकल टेंशन लक्षात घेता भारत-जर्मनीचे संबंध महत्त्वाचे बनले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून भारत-जर्मनीमध्ये फक्त व्यापारी संबंधच नाहीयत, दोन्ही देशात संस्कृती आणि मुल्यांच सुद्धा आदान प्रदान झालं आहे. केवळ आर्थिक निकषावर नव्हे, तर लोकांमध्ये आपल्याला जो सेतू बांधायचा आहे, त्या आधारावर यशाच मुल्यमापून होईल” असं वीएफबी स्टटगार्टचे चीफ मार्केटिंग अँड सेल्स ऑफिसर रूवेन कॅस्पर म्हणाले. “भारत-जर्मनीची भागिदारी केवळ फायद्याच्या निकषावर नाहीय, यात दोन्ही देशातील नागरिकांच हित सुद्धा जोडलेलं आहे” असं रूवेन कॅस्पर म्हणाले.
व्यापाराच्या पलीकडची भागिदारी
“मी नेहमी प्रत्येकाला उद्योगाच्या पलीकडे पुढचा विचार करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. आपण शिक्षण, स्थिरता आणि सांस्कृतिक आदान-प्रदान कसं कायम ठेवायचं? या बद्दल विचार करणं आवश्यक आहे” असं रूवेन कॅस्पर म्हणाले. “या ग्लोबल समिटमधून दोन्ही देशांच्या महत्वकांक्षा आणि अपेक्षा दिसून येतात. यात सहकार्याच्या असंख्य शक्यता आहेत” असं रूवेन कॅस्पर यांनी सांगितलं. मागच्या काही वर्षात भारत-जर्मनीमध्ये व्यापाराच्या पलीकडची भागिदारी बनली आहे, असं ते म्हणाले.
कोण आहेत रूवेन कॅस्पर ?
रूवेन कॅस्पर हे जानेवारी 2022 पासून वीएफबी स्टटगार्टमध्ये चीफ मार्केटिंग अँड सेल्स ऑफिसर म्हणून काम करत आहेत. 1982 साली Mühlacker मध्ये त्यांचा जन्म झाला. स्पोर्ट्स इकोनॉमिस्टने म्हणून त्यांनी चीनच्या शंघाय शहरात असलेल्या एफसी बायर्न म्यूनिखसाठी ‘प्रेसिडेंट आशिया’ म्हणून अनेक वर्ष काम केलं. एशिया-पॅसिफिक रीजनमध्ये सर्व जर्मन रेकॉर्ड चॅम्पियनची एक्टिविटी मॅनेजमेंट संभाळण्याच काम करायचे. आशियात टॉप फुटबॉल ब्रांड्समध्ये एफसी बायर्न म्यूनिख लॉन्गटर्म इस्टॅबलिशमेंट सोबतच या भागात कमर्शियल आणि फुटबॉल-स्पेसिफिक स्ट्रक्चर डेवलप आणि विस्तार हे त्यांचं प्रमुख कार्य होतं.
त्याआधी कॅस्पर यांनी ग्लोबल स्पोर्ट्स मार्केटिंग एजेंसी SPORTFIVE सोबत दहावर्षापेक्षा अधिक काळ काम केलय. एफसी ऑग्सबर्ग आणि हॅम्बर्गर एसवी दोन्ही ठिकाणी मार्केटिंग, सेल्स आणि स्पॉन्सरशिपच काम पहायचे. म्हणूनच स्पोर्ट्स बिजनेसमध्ये त्यांचं नॅशनल, इंटरनॅशनल नेटवर्क आणि एक्सपर्ट्नेस खूप जास्त आहे.
26 बिलियन डॉलरचा ट्रेड
भारत आणि जर्मनीमधील द्विपक्षीय व्यापार पाहिला, तर आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 26.11 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला. सरकारी आकड्यानुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताने 9.84 अब्ज डॉलर्सच्या सामानाची निर्यात केली. 16.27 अब्ज डॉलर्सच सामान आयात केल. 2022-23 मध्ये दोन्ही देशात 26.74 बिलियन डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार झाला. एका सर्वेनुसार जर्मनीतील उद्योग समूह वर्ष 2024-25 मध्ये भारतात गुंतवणूक वाढवण्याचा विचार करत आहेत. जर्मनी पुढच्या काही वर्षांसाठी स्क्ल्डि वर्कर्सचा वीजा वाढवण्याचा विचार करत आहे.