Russia-Ukraine war | युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी मोठा दावा केला. रशियाची मोठी लँडिंगशिप सीज़र कुनिकोवला नष्ट केल्याच युक्रेनने म्हटलं आहे. ही युद्धनौका रशियाच्या ‘ब्लॅक सी फ्लीट’सोबत होती. हल्ला झाला त्यावेळी सीजर कुनिकोव काळ्या सागरात अलुपका या युक्रेनच्या जलक्षेत्रात होती. युक्रेनी सैन्याने हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. ‘युक्रेनने महत्त्वपूर्ण यश मिळवलं असून हा एक मोठा विजय आहे’, असं नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोलटेनबर्ग यांनी म्हटलं आहे. युक्रेनने याआधी सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून काळ्या सागरात रशियन जहाजांना लक्ष्य केलय. रणनितीक दृष्टीकोनातून काळा समुद्र दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाचा आहे. नुकत्याच झालेल्या या हल्ल्याने BSF क्षेत्रात रशियन वर्चस्व कमी झालय. काळा समुद्र युक्रेनसाठी इतका महत्त्वाचा का आहे? ते समजून घेऊया.
युक्रेन जगातील सर्वात मोठा धान्य निर्यातक देश आहे. युद्धाच्या आधी युक्रेन दरवर्षी जागतिक बाजारपेठेत कोट्यवधी टन धान्याचा पुरवठा करायचा. जागतिक बाजारपेठेत सर्व निर्यात काळ्या समुद्रामार्गे व्हायची. पण फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाली आणि निर्यातीचा हा मार्ग बंद झाला. मोठ्या प्रमाणात धान्य देशातील गोदामातच पडून राहीलं.
काय परिणाम झालेला?
युक्रेनी बंदरातून जलमार्गाने जहाजांची सुरक्षित ये-जा शक्य नव्हती. युक्रेनच्या जीडीपीचा मोठा भाग कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. मार्ग बंद झाल्याने मोठं आर्थिक संकट ओढावलं. त्याचा परिणाम जागतिक बाजारात दिसून आला. धान्याच्या कमतरतेमुळे भाव वाढले. खाद्य संकटाची स्थिती निर्माण झाली.
अमेरिकेने या यशावर काय म्हटलय?
रशियासाठी काळा समुद्र रणनितीक दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच रशियाने ब्लॅक सी फ्लीट तैनात केली आहे. काळ्या समुद्रात रशियन नौदलाचा ताफा शक्तीशाली समजला जातो. या माध्यमातून रशिया काळ्या समुद्राच्या एका मोठ्या भागावर नियंत्रण ठेवतो. युक्रेनने याच ताफ्यातील एका जहाजावर हल्ला केला. “युद्धाच्या सुरुवातीला काळ्या समुद्रात रशियन नौदल ज्या पद्धतीने काम करत होतं, तसं काम करण त्यांना आता शक्य होत नाहीय” असं अमेरिकी सरकारने म्हटलं आहे.
+1 russian ship was upgraded to a submarine.
The Armed Forces of Ukraine, together with the units of the @DI_Ukraine, destroyed the Caesar Kunikov large landing ship.
At the time of the attack, the ship was in the territorial waters of Ukraine, near Alupka.Black Sea fish… pic.twitter.com/BTyVRibUUl
— Defense of Ukraine (@DefenceU) February 14, 2024
युक्रेनने मोठी कोंडी फोडली
युक्रेनच्या सततच्या हल्ल्याने काळ्या सागरावरील वर्चस्वाच समीकरण बदललय. यशस्वी हल्ल्यामुळे काळ्या सागरात युक्रेनसाठी प्रमुख शिपिंग कॉरिडोरचा रस्ता मोकळा झालाय. त्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होईल. “रशियाशी कुठलीही तडजोड न करता युक्रेनला आता धान्य निर्या करता येईल. यातून युक्रेनी सैन्याच कौशल्य आणि क्षमता दिसून येते” असं नाटोचे सरचिटणीस स्टोलटेनबर्ग यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत युद्धामध्ये 25 रशियन युद्धनौका आणि एक पाणबुडी नष्ट केल्याचा दावा युक्रेनी सैन्याने केला आहे.